Pune Water Cut Saam TV
मुंबई/पुणे

मेट्रोच्या मार्गिकेला अडथळा; पुण्यातील 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

पुण्यात सध्या मेट्रोचे काम वेगात सुरु आहे.

वृत्तसंस्था

पुणे: सिंध सोसायटीसमोरील पुणे मेट्रो (Pune Metro) मार्गाला अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम गुरुवारी म्हणजेच 21 एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याने पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

औंध गावठाण, आयटीआय रोड, स्पायसर कॉलेज परिसर, औंध रोड, बोपोडी गावठाण, मुंबई-पुणे रोड, भोईटे वस्ती सानेवाडी, आनंद पार्क, दर्शन पार्क, डी-मार्ट परिसर, बाणेर फाटा ते महाबळेश्वर हॉटेल, वर्षा पार्क, माऊली मंगल कार्यालय परिसर इतर. वरील सर्व भागांना शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे, असे पाणीपुरवठा विभाग, पीएमसीचे मुख्य अभियंता यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (No Water Supply In Aundh, Baner, Bopodi On Thursday)

दरम्यान पुण्यात सध्या मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या मार्गीकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते. त्यांनी मेट्रोमधून प्रवास देखील केला होता. आता औंध-बानेर रोडला मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. वाहनांची वाहतूक ही वन वे करण्यात आली आहे. आगामी दोन ते तीन वर्षात या मार्गावरुन नागरिकांना मेट्रोचा आनंद घेता येणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

Hair Care : केसांना मोकळे सोडून झोपावे की बांधून? काय योग्य? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT