car driving  saam tv
मुंबई/पुणे

कारमधील सहप्रवाशांना 'या' तारखेपासून सीटबेल्ट बंधनकारक; नियमाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चारचाकी सहप्रवाशांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चारचाकी सहप्रवाशांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) पोलिसांनी चारचाकी कारमधील सर्वप्रवाशांना १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक असणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Police) परिपत्रक जारी करत दिली आहे.

मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांनी एक प्रेसनोट जाहीर केली आहे. 1 नोव्हेंबरपासून कार चालकांना आणि प्रवाशांना (Seat belt mandatory) सिटबेल्ट लावणं अनिवार्य राहणार आहे. कारचालकाने तसेच प्रवाशांनी सिट बेल्टशिवाय प्रवास केल्यास मोटार वाहन कायदा 2019 च्या अंतर्गत 149 (b) नुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

वाहनचालकांना आणि प्रवाशांना कारमध्ये सिटबेल्टची सुविधा सुरू करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी दिला होता. मुंबईत प्रवास करणाऱ्या कारचालक आणि प्रवाशांना मुंबई पोलिसांकडून सिट बेल्ट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. कार चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन नियम १२५ (१) अन्वये आठ प्रवासी क्षमतेपर्यंत आसन व्यवस्था असलेल्या (Front Facing) सर्व चारचाकी वाहनातील प्रवाशांना सिटबेल्ट वापरणे बंधनकारक आहे. मोटार वाहन (सुधारीत ) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) अन्वये वाहन चालक व प्रवास करणारे सर्व सह प्रवासी यांनी सिटबेल्टचा वापर न केल्यास वाहन चालकांवर ई-चलान कारवाई करण्याबाबत आदेश झाले आहेत.

तसेच दुचाकी चालवणारे चालक व सहप्रवासी (Pillion) यांनी हॅल्मेट परिधान न केल्यास मोटार वाहन कायदा कलम १२९ अन्वये दंडास पात्र आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT