'शिवसेनेला हतबल, बदनाम करून महापालिका निवडणूक...'; अनिल परबांनी साधला विरोधकांवर नेम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
anil parab
anil parab saam tv
Published On

संजय गडदे

Anil Parab News : शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेतेही या पक्ष संकटात असताना विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

anil parab
CM Eknath Shinde : अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाेहचले साता-यात

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी उपस्थितांना संबोधित केले. अनिल परब म्हणाले, 'अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पूर्वीच आपण पेटून उठायचं ठरवलं आणि आपण पेटून उठलो. खरी परीक्षा आता मतदानाच्या दिवशी आहे. आजपर्यंत केलेल्या कामाची परीक्षा आहे. त्यासाठी स्वत:ची लढाई म्हणून लढत आहोत'.

'महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची वीट रचत आहोत. आता विरोधकांची धडकी भरली पाहिजे. मशालीचं काम प्रकाश दाखवणे आहे ते करायचे आहे. शिवसेनेला हतबल आणि बदनाम करून महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा काम विरोधक करत आहेत, असा आरोप करत आमदार अनिल परबांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

anil parab
राज्यातील प्रकल्प जाण्याला कोण जबाबदार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी उपस्थितांना संबोधित केले. लटके म्हणाल्या, 'अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही माझी अग्नी परीक्षा आहे. ती पार करायची आहे. रमेश लटके यांचं स्वप्न अंधेरी पूर्व मतदारसंघाचा विकास करणे हे होते. ते पूर्ण करायचं आहे.त्यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम घ्यायचे आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com