राज्यातील प्रकल्प जाण्याला कोण जबाबदार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रकल्पावरून शिंदे सरकारावर टीकेची झोड उठवली आहे. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
eknath Shinde
eknath Shinde saam tv
Published On

Eknath Shinde News : महाराष्ट्राबाहेर टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार आहे. त्यानंतर आता सॅफ्रन प्रकल्प देखील राज्याबाहेर जाणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रकल्पावरून शिंदे सरकारावर टीकेची झोड उठवली आहे. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

eknath Shinde
Vedanta Foxcon: फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल, आदित्य ठाकरेंचा आरोप

'राज्यातील प्रकल्प जाण्याला कोण जबाबदार? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री यावर आता मी सविस्तरपणे बोलणार नाही. मला कोणतेही राजकारण करायचे नाही', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'राज्यात प्रकल्प येण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी आमचा सातत्याने संपर्क असून केंद्रीय मंत्र्यांशी देखील राज्याच्या विकासाच्या बाबत आम्ही संपर्कात आहोत. पुढील काळामध्ये लवकरच आम्ही नवीन मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणू'.

eknath Shinde
MNS : आणखी प्रकल्प राज्याबाहेर गेला? मनसे आमदाराने शिंदे गटावर कडाडले , म्हणाले...

'राज्यातून जे प्रकल्प गेले असा आरोप सुरू असून याला जबाबदार कोण आहे ? हे मी आता सविस्तरपणे बोलणार नाही. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृतपणे मांडले आहे. मला याबाबतीत कोणतेही राजकारण करायचं नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील 'क' वर्ग पर्यटन तसेच धार्मिक आणि यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामदैवत उतेश्वर देवाचे दर्शन घेत राज्य प्रगतीपथावर जाऊदे असं साकडं देखील घातलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com