MNS : आणखी प्रकल्प राज्याबाहेर गेला? मनसे आमदाराने शिंदे गटावर कडाडले , म्हणाले...

टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
raju patil
raju patil saam tv

Maharashtra Political News : नागपुरचा सॅफ्रन प्रकल्प आता राज्याबाहेर जाणार आहे. एकापाठोपाठ उद्योग राज्याबाहेर जात असल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे. यावरून राजकारण सुद्धा होताना दिसत आहे. विविध पक्षातील नेत्यांनी प्रकल्पाच्या मुदद्यावरून शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून मनसेचे आमदार राजू पाटील (Raju patil) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

raju patil
Raj Thackeray : "मोठे प्रकल्प गुजरातला जात असतील तर..." राज ठाकरे पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणाले

वेदांता-फॉक्सकॉन त्यानंतर टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्र मधून गुजरातला गेले. त्यानंतर महाराष्ट्रात एकच राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकार यांच्यामधील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये.

बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून मात्र डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विविध ठिकाणी बॅनर झळकवले आहेत. 'उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा' अशा आशयाचे बॅनर शिंदे गटामार्फत लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्रातून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत त्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यात आले आहे. शिंदे गटाच्या सुरू असलेल्या बॅनरबाजीवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी निशाणा साधला आहे.

राजू पाटील म्हणाले, 'मागच्या सरकारमध्ये आताचे काही मंत्री होते. ते उद्योग का गेले हा संशोधनचा विषय आहे. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा या सरकारने किती उद्योग आणले. समोर यायला पाहिजे'.

'मला वाटतं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, २५ हजार कोटींची उद्योग आणलेत. मागच्या सरकार मध्ये तसे काही दिसलेली नाही आहे. परंतु काही उद्योग गेलेले आहे तेवढेच खरे आहे', असेही राजू पाटील म्हणाले.

raju patil
Vedanta Foxcon: फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल, आदित्य ठाकरेंचा आरोप

दरम्यान, आज मनसे आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या काटई गावातील वातानुकूलित व्यायाम शाळेचे उदघाटन करण्यात आले. तसेच निळजे आणि देसलेपाडा येथील रस्त्याच्या भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया ही दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com