Raj Thackeray : "मोठे प्रकल्प गुजरातला जात असतील तर..." राज ठाकरे पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणाले

मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे, असं राज ठाकेर यांनी म्हटलं.
Raj Thackeray
Raj Thackeray Saam TV
Published On

मुंबई : राज्यातील मोठे प्रोजेक्ट एकामागून एक बाहेर जात आहेत. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रम, टाटा एअर बस, सॅफ्रन असे मोठा प्रकल्प बाहेर गेल्याने राजकारण तापलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक तुटून पडत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यातून जो प्रकल्प बाहेर गेला तो गुजरातमध्ये गेला. माझं तर पहिल्यापासून मत होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे. महाराष्ट्रातील प्रकल्प आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं, मात्र, वाईट या गोष्टीचं वाटतं की जो प्रकल्प बाहेर पडतोय तो शेवटी गुजरातला जातो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याकडे लक्ष देणं गरेजंच आहे. प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Raj Thackeray
"पुढाऱ्यांची पोरं पुढारीच होणार हा निसर्गाचा नियम", भाजपच्या बबनराव लोणीकरांचं वक्तव्य

मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत. तिथल्या लोकांना तिथे रोजगार उपलब्ध झाले पाहिजे. इतर राज्यांवर बाहेरच्या लोकांचं ओझं झालं नाही पाहिजे. असे प्रकल्प प्रत्येक राज्यात गेले तर देशाचाच विकास होईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray
Tata Airbus Project: सरकारविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार, गाजर दाखवून निषेध आंदोलन, फडणवीसांच्या घरी सुरक्षा वाढवली

महाराष्ट्र हे राज्य उद्योगधंद्यांच्या बाबतीत इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत पुढे आहे. उद्योगपतींसाठी नेहमीच महाराष्ट्र प्राधान्य राहिला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये खुप सुविधा आहेत आणि महाराष्ट्रात नाहीत असं नाही होत. या गोष्टींकडे राजकीय न पाहता प्रत्येक राज्य मोठं करणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com