कल्याण : सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांचा (Loudespeeker) विषय चांगलाच गाजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भूमिका मांडल्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात विविध प्रतिक्रिया दिल्या. मात्र, आम आदमी पक्षाने कोणतेही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज कल्याण (Kalyan) मध्ये आम आदमी पार्टीने (AAP) आपली भूमिका मांडत सांगितले की, सर्व जाती धर्मांना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारे राष्ट्रगीत चौकाचौकात आम्ही वाजवणार आहोत.
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावर आली असताना आम आदमी पक्ष्याच्या वतीने संघटना मजबूत करण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान आज कल्याणात आम आदमी पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दीपक सिंघल, गोव्याचे माजी उद्योगमंत्री महादेव नाईक, प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी कार्यकर्त्याना पक्ष बळकटीकरणासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ऑगस्ट 2016 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशात कोणत्याही एका धर्माबद्दल न बोलता सर्व धार्मिक स्थळावरील धवनिक्षेपकाच्या आवाजाला 75 डेसीबलची मर्यादा घालून दिली आहे. मात्र मनसे बेरोजगार तरुणांचा बुद्धिभेद करत आहे.
तसेच महागाईने होरपळलेल्या आणि जगण्याचे प्रश्न निर्माण झालेल्या समाजात आपापसात फूट पाडुन त्यांना जगण्याच्या प्रश्नापासून दूर करण्याची भाजपासह इतर राजकीय पक्षाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. म्हणूनच सर्वच भोंग्याचा निषेध करत सर्व जाती धर्माना एकत्र आणून राष्ट्रीय सलोखा निर्माण करणारे राष्ट्रगीत (Rashtrageet) आप कडून चौकाचौकात वाजवले जाणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महागाईला केंद्र व राज्य सरकार जवाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.