मुंबईतील मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्या झडपा बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवार दिनांक ९ आणि शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापराने असे आवाहन केलं आहे. (Latest Marathi News)
मुंबई महापालिकेच्या मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्या झडपा, जुन्या व खराब झाल्या आहेत. यामुळे या झडपा एकूण १० जलद्वार बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. तर संपूर्ण काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येईल.
त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे जसे की, ९०० मिली मीटर व्यासाचे तीन व ७५० मिली मीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०४ जलद्वारे (वॉल्व) येत्या सोमवारी (९ ऑक्टोबर) बदलण्यात येणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामे जसे की, ९०० मिली मीटर व्यासाचे ०२ व ७५० मिली मीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०३ जलद्वार शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्यात येतील.
मालाड येथील सदर कालावधीत सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी व शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पूर्व), ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव (पूर्व) आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरांमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे :-
१) ‘पी उत्तर’ – मालाड (पूर्व) परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
२) ‘पी दक्षिण’ – गोरेगाव (पूर्व) परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
३) ‘आर दक्षिण’ – कांदिवली (पूर्व) येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा - १ व २, नर्सीपाडा परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.