Pressure Cooker Cleaning: प्रेशर कुकरच्या शिटीमध्ये घाण साचलीये? या सोप्या पद्धतीने 2 मिनिटांत करा साफ!

Surabhi Jayashree Jagdish

प्रेशर कुकरचा रोजचा वापर

भारतीय स्वयंपाकघरात प्रेशर कुकरचा वापर अगदी सामान्य आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक घरांमध्ये कुकरच्या शिट्टीचा आवाज ऐकायला मिळतो. अन्न लवकर आणि सहज शिजवण्यासाठी प्रेशर कुकर उपयोगी ठरतो. यामुळे गॅसची बचत होते आणि स्वयंपाकासाठी जास्त वेळ उभं राहण्याची गरज पडत नाही.

Pressure Cooker Cleaning Tips | saam tv

कुकरची शिट्टी

रोज वापरल्या जाणाऱ्या कुकरची वेळोवेळी स्वच्छता करणंही तितकेच महत्त्वाचं आहे. कुकरच्या झाकणावरील वाफ बाहेर जाण्याचे छिद्र आणि शिट्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. स्वयंपाक करताना अन्नाचे छोटे कण, पाणी आणि इतर घाण या छिद्रात अडकू शकते. छिद्रात घाण साचल्यास वाफ आणि प्रेशर बाहेर पडण्यात अडचण येऊ शकते.

Pressure Cooker Whistle Cleaning | saam tv

कशी स्वच्छ करावी?

कुकरच्या झाकणावरील छिद्रातून अतिरिक्त वाफ आणि प्रेशर बाहेर पडते. वापरामुळे या छिद्रात अन्नाचे बारीक कण, पाणी किंवा इतर घाण साचू शकते. स्वच्छता करण्यापूर्वी कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आणि त्यातील प्रेशर पूर्णपणे निघालंय का याची खात्री करा. त्यानंतर टूथपिकच्या मदतीने छिद्रात अडकलेली घाण हलक्या हाताने काढा आणि छिद्राच्या आजूबाजूचा भागही स्वच्छ करा.

Pressure Cooker Vent Cleaning | saam tv

या चुका टाळा

कुकरचं छिद्र स्वच्छ करताना त्याला नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. छिद्रावर खूप जोर लावून घासणं टाळावं. तसंच धातूचा स्क्रबर किंवा टोकदार धातूच्या वस्तू वापरू नयेत. अशा वस्तूंमुळे कुकरच्या पृष्ठभागावर ओरखडे पडू शकतात.

Pressure Cooker Safety Tips | saam tv

या गोष्टी लक्षात ठेवा

रिकामा कुकर कधीही गरम करू नये, कारण त्यामुळे कुकर खराब होऊ शकतो आणि त्याचा रंगही बदलू शकतो. स्वयंपाक करताना कुकरमध्ये पुरेसं पाणी किंवा इतर द्रव पदार्थ असणं आवश्यक आहे. तसंच मीठ असलेलं अन्न कुकरमध्ये रात्रभर ठेवू नये. कारण त्यामुळे स्टीलच्या पृष्ठभागावर परिणाम होऊ शकतो.

Kitchen Cleaning Tips | saam tv

कुकरची सर्व छिद्रे स्वच्छ ठेवा

कुकरची सर्व वाफ बाहेर जाणारी छिद्रं स्वच्छ आणि अन्नाच्या कणांपासून मुक्त ठेवणं आवश्यक आहे. पाण्यात खनिजांचं प्रमाण जास्त असल्यास कुकरच्या पृष्ठभागावर पांढरे डाग दिसू शकतात. हे डाग काढण्यासाठी गरम लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरून कुकर स्वच्छ करता येतो. कुकर साफ करताना मेटल स्क्रबर, स्टील वूल, ब्लीच किंवा तीव्र रसायने असलेली स्वच्छता उत्पादने वापरू नयेत.

Kitchen Hacks | saam tv

प्रत्येक वापरानंतर कुकर स्वच्छ करा

कुकरचा प्रत्येक वेळी वापर झाल्यानंतर तो स्वच्छ करणं चांगलं असतं. यासाठी कुकरचा आतील आणि बाहेरील भाग गरम पाणी व साबणाने धुवावा. यासाठी सामान्य किचन स्पंज आणि भांडी घासण्याचा साबण पुरेसा आहे. कुकरच्या आत हट्टी डाग असतील तर अर्ध्या लिंबाचा रस घेऊन आतील पृष्ठभागावर हलक्या हाताने चोळावा.

Clogged Pressure Cooker Vent | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Immunity booster | saam tv
येथे क्लिक करा