Thane Ring Road Project: ठाणेकरांचा प्रवास वेगवान अन् सुलभ होणार; प्रवास सुकर करणारा ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प नेमका आहे तरी कसा?

Thane Ring Road Project: नागरिकांचा प्रवास सुखकर करणारा 'ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प' काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला
Thane Ring Road Project
Thane Ring Road Project Saam tv
Published On

Thane Ring Road Project

मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातही रहदारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना रांगा लावाव्या लागत आहे. या पार्श्वभूमीवर सरकराने ठाणेकरांचा वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे हाती घेतली आहे. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता सरकारने नागरिकांचा प्रवास सुखकर करणारा 'ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प' काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला. (Latest Marathi News)

नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली.

मंत्री हरदीप सिंह पुरी यांना सामान्य नागरिकांना सार्वजनिक दळणवळणाची सुविधा आरामदायी आणि गतिमान आवश्यक आहे या तळमळीतून मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली भेटीत त्यांनी ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो प्रकल्प किती गरजेचा असल्याचे सांगितले.

Thane Ring Road Project
Thane Railway Station: जीवघेणा प्रवास! ठाणे रेल्वे स्थानकात एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटनेचा धोका; पाहा भयंकर गर्दीचा व्हिडीओ

मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या भेटीत महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा झाली. तसेच या भेटीत ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा झाली. शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. ठाण्याचा विस्तार होत आहे. यामुळे शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे.

ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला आहे. त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी करतानाच मेट्रो कोचची संख्या वाढविण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

तसेच सद्यस्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीने मेट्रो कोच वाढविणे आवश्यक आहे. रिंग मेट्रोच्या प्रकल्प अहवालाला मान्यता देतानाच मेट्रो कोचची संख्या वाढवावी, या मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर केलेल्या मागणीवर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. राज्यात नागरी भागात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

Thane Ring Road Project
Mumbai Local Train Dance Video: लोकल ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा पोल डान्स; नेटकऱ्याने थेट मुंबई पोलिसांनाच टॅग केलं

असा आहे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प ?

एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड आहे. तर ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके आहेत. त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत.

या प्रकल्पापातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. त्याचबरोबर इतर स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com