no water cut till july in pune know the khadakwasla dam water level  Saam Digital
मुंबई/पुणे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Pune Water Supply News : पुणे महापालिका आयुक्त यांनी बैठक बोलावली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास पाटबंधारे विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

खडकवासला धरणात असलेले पाणी पुणे महापालिकेसाठी जुलै अखेरपर्यंत राखीव ठेवण्यात आले आहे. यामुळे तूर्तास पाणी कपातीचा निर्णय पुढे ढकलण्यात यावा असा सूर महापालिकेच्या बैठकीत आळवला गेला. त्यास मान्यता मिळाल्याने पुणे शहरावर असलेले पाणीकपातीचे संकट टळलं आहे. दरम्यान नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Maharashtra News)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघा साडेसहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पुढील काही महिन्यांत पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात हाेती.

या सर्व गाेष्टी लक्षात घेऊन धरणातील पाण्याचा आढावा महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या धरणातील पाणी महापालिकेसाठी जुलै अखेरपर्यंत राखीव ठेवण्यात आले असल्याने तूर्तास पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर पडला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बैठकीत पाणी कपातीची गरज नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे शहरावर असलेले पाणीकपातीचे संकट टळले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT