No Toll Entering in Mumbai No Toll Entering in Mumbai
मुंबई/पुणे

No Toll Entering in Mumbai: कोणत्या ५ टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोल माफी, लाखो गाड्यांना फायदा होणार?

No Toll Entering in Mumbai : वाशीसह ५ टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आलाय. ६ लाख वाहन चालकांना फायदा होणार आहे.

Namdeo Kumbhar

No Toll Entering in Mumbai: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने टोलमाफीचा मोठा निर्णय घेतलाय. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णायाचा सहा लाख हलक्या वाहन चालकांना फायदा होणार आहे.

कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?

आनंदनगर टोलनाका

दहिसर टोलनाका

मॉडेला टोलनाका

वाशी टोलनाका

ऐरोली टोलनाका

मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली. या पूलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते. पूल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी सन १९९९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. २००२ मध्ये पाचही टोलनाके कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू केली होती.

मनसेची अनेक वर्षांपासूनची मागणी -

महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई मधले टोल माफी करण्यात यावी यासाठी वारंवार मनसेकडून आंदोलन करण्यात येत होतं.

अनेक वेळा राज ठाकरे यांनी आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे देखील या संदर्भात भेट घेतली होती.

टोल माफीचा चांगला निर्णय आहे. हा विकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी डिझेल पेट्रोलवर जास्त कर लावला होता. महायुतीच्या सरकारने त्यातून सुटका केली.
सुधीर मुनगंटीवार

दादा भुसे काय म्हणाले ?

टोल माफीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. 45 आणि 75 रुपये अशी आकारणी केली जात होती.

2026 पर्यंत टोलची मुदत होती. भविष्यातील आणखीन वाढण्याची शक्यता होती. 2 लाखांपेक्षा जास्त वाहनांना याचा दिलासा मिळेल. टोल आंदोलनामध्ये वित्तीय नुकसान करणाऱ्या आंदोलकांबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

SCROLL FOR NEXT