petrol Diesel Saam tv
मुंबई/पुणे

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

petrol Diesel updeate : महाराष्ट्रात लवकरच "नो PUC नो फ्युएल" धोरण लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीयूसीधारकांना पेट्रोल-डिझेल मिळण्याची शक्यता आहे.

Saam Tv

महाराष्ट्रात लवकरच "नो PUC नो फ्युएल" धोरण लागू होणार

प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनांचे PUC स्कॅन करून इंधन दिलं जाणार

अवैध प्रमाणपत्र निर्मिती रोखण्यासाठी UID आधारित प्रणाली लागू

वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ PUC मिळवण्याची सुविधा उपलब्ध

मुंबई : भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनाला दिलं जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचं आहे. बेकायदेशीर मार्गाने प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे. यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोलपंपावर 'नो पीयूसी नो फ्युएल' उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत.

मंत्री सरनाईक काय म्हणाले?

'राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून ) जाईल. या माध्यमातून संबंधित वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल, असे मंत्री सरनाईक यांनी म्हटलं.

सरनाईक पुढे म्हणाले, 'त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाहीत. त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था केली जाईल. या वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटी (UID) असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते'.

'भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक वाहनांवर वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल. यामुळे प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत होईल. तसेच अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मोठा परिवहन विभागाने मोहीम राबवावी, असा सूचना देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.

मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे, परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT