Dombivli News Saam Tv
मुंबई/पुणे

शाखेवर काेणी हक्क सांगू नये ती सेनेचीच राहणार - गोपाळ लांडगे

शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला

प्रदीप भणगे

डोंबिवली - शिंदे समर्थक आणि शिवसेना यांच्यामध्ये राडा झाल्यानंतर डोंबिवलीत शिंदे समर्थकांनी डोंबिवली (Dombivli) शहर भर सभासद नोंदणीचे बॅनर लावत आणि सर्वेश हॉल येथे सभा घेत शक्तीप्रदर्शन केले आहे.तसेच यावेळी हजारो सदस्य नोंदणीचे फॉर्म वाटले. यावेळी शिंदे समर्थकांनी गर्दी केली होती. दरम्यान शिंदे समर्थक आणि जिल्हाप्रमुख यांना राड्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की शाखा माझ्या बापाची प्रॉपर्टी म्हणून त्याच्यावर कोणी हक्क सांगू नये ती शिवसेनची प्रॉपर्टी आहे आणि निश्चित पणे ती शिवसेनेची राहणार.

सभेला जिल्हा परिषद सद्यस भरत भोईर, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे,रणजित जोशी,नितीन पाटील, विश्वनाथ राणे आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.यावेळी पत्रकारांनी शिंदे समर्थक आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे झालेल्या राड्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की एखादी शाखा माज्या बापाची प्रॉपर्टी  म्हणून त्याच्यावर कोणी हक्क सांगू नये ती शिवसेनची प्रॉपर्टी आहे आणि निश्चित पणे ती शिवसेनेची राहणार असे सांगितले.

हे देखील पाहा -

शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात राडा...

शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला आहे. शिंदे समर्थक शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत घुसले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो या शिवसेना शाखेतून काढण्यात आले होते. यामुळे शिंदे गटाचे समर्थक आक्रमक झाले आणि शिंदे गटातील ४०० ते ५०० जणांनी शिवसेना शाखेत घुसून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला शिवसैनिक, तरुण आणि पुरुष शिवसैनिक असे सगळ्याच वयोगटातील शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले आहेत.

रामनगर पोलिस याठिकाणी पोहोचले आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याठिकाणी डोंबिवली पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.दरम्यान याबाबत आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते हे पहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT