ajit pawar SaamTvNews
मुंबई/पुणे

Corona : पुणे जिल्ह्यात उद्यापासून 'नो वॅक्सिन, नो एन्ट्री'!

अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये कोरोना स्थितीबाबत पत्रकार परिषदेद्वारे महत्वपूर्ण भाष्य केले.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : राज्यातील वाढती कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता आम्हाला टोकाचे निर्णय घ्यायला भाग पाडू नका असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे. आज पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले असून तब्बल १ हजार १०४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :

कोरोनाची स्थिती बिकट होते चालली आहे.

पुणे जिल्ह्यात ७४ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. उरलेल्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण करावे. दोन्ही डोस घेतलेल्यांना लक्षणे कमी आहेत.

सर्वांनी लस घ्यावी, कोरोना नियमांचे पालन करावे, आम्हाला टोकाचा निर्णय घ्यायला लावू नका.

पुण्यात पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा ३० जानेवारी पर्यंत बंद राहणार आहेत.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणसाठी देखील हा निर्णय लागू राहील.

पुणे शहरात कोरोना १८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे काळजीने निर्णय घेतोय.

कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होईल अशा बातम्या येत आहेत.

त्यामुळे पूर्वीचा कोरोना की डेल्टा याचा विचार करू नका कोरोना नियमांचे पालन करा.

आज पुण्यात १ हजार १०४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चिंता वाढत आहे.

१५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या गटातील लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करू.

लसीकरण झालेले देखील पॅाझिटिव्ह येतात त्यावर विचार करा.

वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी, २ प्लाय मास्क वापरण्याऐवजी ३ प्लाय किंवा N95 मास्क वापरावेत.

ट्रीटमेंट प्रोटोकॉल केंद्र सरकारने लवकर कळवावा.

उद्या सकाळी ९ वाजता मी बैठक घेणार आहे. एकच ऑर्डर (आदेश) काढण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येईल.

पुण्यात उद्यापासून मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येईल.

मास्क नसताना कोणी थुंकला तर १००० रुपये दंड आकारण्यात येईल.

दोन्ही लस घेतल्याशिवाय कुठेही प्रवेश मिळणार नाही (सरकारी कार्यालये, हॉटेल)

सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे.

पुणे जिल्ह्यात उद्यापासून 'नो वॅक्सिन, नो एन्ट्री'; अजित पवारांची घोषणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT