सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई - पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. बऱ्याच मोठं मोठ्या कंपन्या येथे येणार आहेत. त्यामुळे याठिकाणी 10 लाख लोकसंख्या क्षमतेचे स्मार्ट शहर आता आपण तयार करायला हवे. येथे रोजगार मिळणाऱ्या लोकांना घरं आणि वाढणारी लोकसंख्या यासाठी सुनियोजित शहर झाले पाहिजे. सिडकोने जर येथे विकास केला तर हा सर्व परिसर भारतातील एक आदर्श परिसर म्हणून नावारूपास येईल असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
हे देखील पहा -
तसेच कोकणासाठी सागरमाला 2 मध्ये समाविष्ट सागरी मार्ग करणार करण कोकणाचे टुरिसम याच भागाला आहे. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांना एक विनंती केली की मी सी प्लेन आणलं आहे. 18 कोटी रुपयांचे हे विमान आहे. मुंबईत पैशाची कमी नाही असे 10 प्लेन विकत घ्या आणि मुंबईतून कोकणातील गावात जात येईल अशी व्यवस्था करा म्हणजे या रस्त्याने जाण्याची झंझटच राहणार नाही अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.
तर मुंबई गोआ हायवे बांधला, आज उद्घाटन केलेला हायवे देखील पाहिला मात्र झाडे कमी दिसली आता या हायवेला ग्रीन हायवे करण्याची जबाबदारी येथील लोकप्रतिनिधींची आहे. जेएनपीटीला एक मोठी नर्सरी करून याठिकाणी 3 मीटर पेक्षा मोठी झाडे लावली पाहिजेत हा आग्रह असून अजून आनंदमय प्रवास याने होईल अशी अपेक्षा यावेळी नितीन गडकरी यांनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.