Nitesh Rane News
Nitesh Rane News Saam Tv
मुंबई/पुणे

''राज्यात अघोषित गॅंगवॉर, आम्ही गप्प बसणार नाही, तांडव होणार''...(पाहा व्हिडिओ)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आम्हाला राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची नाही. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते मस्ती करत आहेत. त्यांचे जे नातवाईक असा धिंगाणा घालत आहेत, तर राज्यातील जनतेने कायदा सुव्यवस्थेविषयी कोणाकडून अपेक्षा ठेवावी असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्यांच्यावर हल्ला (Attack) झाला आहे. हा नामर्दणपणाचा प्रकार सुरु असल्याचे नितेश राणे (Nitesh Rane) यावेळी म्हणाले आहेत.

पाहा व्हिडिओ-

तुम्ही हल्ले करताना आम्ही शांत बसणार नाही असे राणे यावेळी म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असा इशारा देखील राणे यांनी दिला आहे. फक्त 24 तास गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) पोलिसांना सुट्टी द्यावी. मग या हल्ले करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील राणेंनी दिला. आम्ही विचारांची लढाई विचाराने करु, दगडाची भाषा दगडाने करु असे देखील राणे यावेळी म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असे राणे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री पोलिसांवर (police) दबाव टाक असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

तुम्हाला आमच्या जीवापर्यंत यायचे असेल तर आम्हालाही जीवाचे संरक्षण करायचे आहे. ही राजकीय लढाई नाही, कारण राजकीय लढाई ही व्यासपीठावर लढली जाते. हे सध्या अघोषीत गँगवार सुरु असल्याचे राणे म्हणाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता काही काम राहिले नाही. राणेंचे घर कधी पाडणार, सोमय्यांवर कधी केस टाकणार, दरेकरांना कसे अटकवणार हेच मुख्यमंत्र्यांचे काम राहिले आहे असे राणे यावेळी म्हणाले. यावेळी नितेस राणेंनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला असून त्यामध्ये ते जखमी झाले आहेत.

रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेऊन परतत असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकले होते. राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली. भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांना भेटायला गेले होते. राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटली. तसेच ते जखमी झाले. यावरुन सध्या विरोधक शिवसेनेवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs MI, IPL 2024: रोहित वाढदिवशी मुंबईला गिफ्ट देणार? लखनऊविरुद्ध टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड

Sonalee Kulkarni : ही तर गुलाबी साडीमधली सोनपरी

Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेच्या रिंगणात महंतांची मांदियाळी; शांतीगिरी महाराजांनंतर आणखी एका महंताने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Sangli Loksabha: सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली; वंचित आघाडीकडून पाठिंबा जाहीर

Narendra Modi : नकली शिवसेना-राष्ट्रवादीने राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण धुडकावलं; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT