आदित्य ठाकरेवरील टिप्पणीवरून नितेश राणेची दिलगिरी Saam T v
मुंबई/पुणे

आदित्य ठाकरेंवरील टिप्पणीवरून नितेश राणेंची दिलगिरी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांचा तोल गेला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा तोल गेला आहे. काल विधिमंडळात पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची स्वतः ची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे वादग्रस्त व आक्षेपाचे वक्तव्य नितेश राणे यांनी केली होती.

यानंतर मुंबई मध्ये शिवसैनिकांनी जोरदार राडा करायला सुरवात केली. आता त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून भावना दुखावल्या असल्याचे शब्द मागे घेतो असे ट्विट करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजप मधील १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली होती.

या निलंबनाच्या कारवाई चे निषेध म्हणून विधिमंडळात अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही कामकाजात मध्ये भाजप आमदारांनी सहभाग नोंदविला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवरच बसून, भाजप आमदारांनी सरकार विरोधात आपला राग व्यक्त केल आहे. यावेळी भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. त्या ठिकाणी भाषण करत असताना, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. सरकारवर टीका करताना, सरकारच्या कार्यपद्धतीवर नितेश राणे चांगलेच आक्रमक झालेल दिसून आले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का, यासाठी त्यांनी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे विधान नितेश राणे यांनी यावेळी केले होते. नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे मुंबईमधील शिवसैनिक जोरदार आक्रमक झालेल दिसून आले. सकाळी भारतमाता सिनेमा समोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन देखील केले आहे. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला आहे.

यादरम्यान, पोलीस व शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झटापट देखील पाहायला मिळाली आहे. आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी आदित्य ठाकरेची माफी मागावी व इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावे, असे प्रत्युत्तर नितेश राणेंना दिले आहे. विधानसभेबाहेर माझ्या कालच्या भाषणामधून मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केल होत, तो बर्‍याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला आहे. जर भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो, अशा प्रकारचे ट्विट नितेश राणे यांनी यावेळी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळवा ₹८२०००; कॅल्क्युलेशन वाचा

Crime News : आठवीच्या मुलाचे शाळेत भयंकर कृत्य, वॉशरूममध्ये वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

Maharashtra Election : महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Ashok Mama : 'बिग बॉस मराठी' सुरू होण्याआधीच अशोक मामांची एक्झिट; मालिकेचा शेवट कसा होणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT