निळजे रेल्वे ओव्हरब्रिज पुनर्बांधणी १६ नोव्हेंबरपासून सुरू
२०२६ मार्चपर्यंत विस्तृत वाहतूक निर्बंध लागू
ठाणे वाहतूक पोलीसांनी जड व हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग दिला
कल्याण–शिळ रोडवर मोठ्या कोंडीची शक्यता
नागरिकांना पूर्वनियोजनाचे आवाहन
संघर्ष गांगुर्डे, कल्याण-डोंबिवली
डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज म्हणजेच १६ नोव्हेंबर पासून ते ३१ मार्च २०२६ पर्यंत निळजे रेल्वे ओव्हरब्रिज पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे शहर वाहतूक उपविभागाने व्यापक वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. शिवाय पर्यायी वाहतुकीचे नियोजन आखण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निळजे रेल्वे ओव्हरब्रिजची उंची कमी असल्याने Dedicated Freight Corridor (JNPT–Vaitarana Section) वरील डबल डेकर कंटेनर वाहतुकीस अडथळा येत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी ब्रिजच्या पुनर्बांधणीची महत्त्वपूर्ण कामे १६ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत असून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत.
पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 (1)(अ)(ब) अंतर्गत विविध रस्त्यांवर प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे शहर वाहतूक उपविभागाने व्यापक वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. या निर्बंधांमधून पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट असेल.
कल्याण → शिळफाटा
निळजे कमानजवळून सर्व वाहनांना प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : निळजे कमान → उजवीकडे लोढा पलावा वाहीनी → महालक्ष्मी हॉटेल → पुढे इच्छित स्थळी.
लोढा पलावा / कासाबेला / हेवन / एक्सपिरिया मॉल → कल्याण
निळजे ब्रिज चढणीवरून कल्याणकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : कल्याण–शिळ रोड → शिळफाटा → देसाई खाडी ब्रिज → सरस्वती टेक्सटाईल → यू-टर्न → पलावा फ्लायओव्हर.
मुंब्रा / कल्याण फाटा → कल्याण (६ चाकी व जड वाहने)
कल्याण फाटा येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : शिळफाटा → मुंब्रा बायपास → खारेगाव टोलनाका.
कल्याण → मुंब्रा / कल्याण फाटा (६ चाकी व जड वाहने)
काटई (बदलापूर) चौक येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : काटई चौक → खोणी नाका → तळोजा MIDC.
तळोजा MIDC / नवी मुंबई → काटई चौक (६ चाकी व जड वाहने)
खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : निसर्ग हॉटेल → उजवे वळण → बदलापूर पाईपलाइन → नेवाळी.
अंबरनाथ / बदलापूर → काटई चौक (६ चाकी व जड वाहने)
खोणी नाका येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : खोणी नाका → डावे वळण → तळोजा MIDC.
मुंबई/नवी मुंबई → कल्याण : दिवा–संदप रोड → मानपाडा → कल्याण–शिळ रोड
ठाणे/मुंबई → कल्याण : मानकोली–मोटागाव–डोंबिवली मार्ग किंवा रांजनोली–कोनगाव–कल्याण मार्ग
कल्याण/डोंबिवली/उल्हासनगर → मुंबई/नवी मुंबई : चक्कीनाका → श्री मळगाई पेड → नेवाळी → बदलापूर पाईपलाईन → तळोजा MIDC
कल्याण/डोंबिवली → ठाणे/मुंबई : डोंबिवली → मोटागाव → मानकोली → दुर्गाडी → कोनगाव → नाशिक–मुंबई महामार्ग
निळजे ब्रिजवरील पुनर्बांधणीमुळे कल्याण–शिळ रोडवरील वाहतूक काही महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.