nilesh rane criticized aaditya thackeray about worli constituency  Saam Tv
मुंबई/पुणे

Worli Constituency : आदित्य ठाकरेंचं कर्तृत्व शून्य, विधानसभा निवडणुकीत आपटणार : निलेश राणे

nilesh rane criticized aaditya thackeray: रोहित पवार काय म्हणतात त्यांचा अभ्यास किती यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण ते एवढे नवीन आहेत त्यांच्यावर प्रतिक्रिया काय द्यायची असे निलेश राणेंनी म्हटले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

आदित्य ठाकरे हे स्वतःच्या कर्तुत्वावर निवडून आलेले नाहीत. त्यांचा स्वतःचा कर्तुत्व शून्य आहे. दोन आमदार रेडिमेड तयार झाले. पक्षाने तयार केले. वडील मुख्यमंत्री होते म्हणून ते निवडून आले. आता आपटणार. आगामी निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे काय परत आमदार म्हणून जात नाही असे भाकित भाजप नेते निलेश राणे यांनी केले.

वरळीचे मताधिक्य घटले या प्रश्नावर बाेलताना निलेश राणे म्हणाले अरविंद सावंत हे निवडून आले हा त्यांच्यासाठी जॅकपॉट आहे. समीकरण वगैरे सगळं ठीक आहे. ते कसे निवडून आले हे आम्हांलाही माहिती आहे. आदित्य ठाकरे हा काय वरळीचा उमेदवार नव्हता असे राणेंनी म्हटले.

निलेश राणेंनी रोहित पवार यांच्यावर फारसे बाेलणे टाळले. ते म्हणाले राेहित पवार काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही. नवा नवा प्याज चिलना सिखा है, अजून ते फार लहान आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये. पवार साहेब यांचे मी समजू शकतो. त्यांची उंची त्यांचं राजकीय वय या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT