- सुशिल थोरात
Nilesh Lanke : महाविकास आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi) काळात गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte), सदाभाऊ खोत (sadabhau khot) आणि आमदार गोपीचंद पडळकर (mla gopichand padalkar) यांनी एसटी कर्मचा-यांचे (msrtc employees strike) आंदोलन पेटवण्याचे काम केले. मात्र सरकार बदलल्यानंतर एसटी कामगारांबद्दल झटणारा नेते बोलायला तयार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखाचा त्यांना देणंघेणं नसल्याची टीका आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली.
नगर (nagar) येथे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरून सरकारवर निशाणा साधला. आमदार लंके म्हणाले फक्त राजकारण पेटवण्यासाठी त्यांनी संघर्ष निर्माण करण्याचं काम केले. त्या संघर्षात एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम भडकविणा-यांनी केल्याचा घणाघात लंके यांनी केला.
खासदार गिरीश बापट यांच्या प्रचारावरून आमदार निलेश लंके यांनी भाजपला धारेवर धरले. भाजप हे प्रत्येकाच्या जीवाशी खेळण्याचे काम करत असल्याचं लंके यांनी म्हटलं. विधानपरिषद निवडणुकीत देखील आमदार मुक्त टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना ॲम्बुलन्स मधून मतदानाला आणलं तर गिरीश बापट यांना देखील ऑक्सिजन लावलेला असताना प्रचाराला आणला हे चुकीचं असल्याचे त्यांनी नमू केले.
माणूस महत्त्वाचा नसून भाजपला फक्त सत्ता महत्त्वाची असा टोला आमदार निलेश लंके यांनी भाजपला लगावला. एखाद्याचा जीव गेला तरी चालेल मात्र आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे अशी भाजपवर घणाघाती टीका लंके यांनी केली. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.