Supriya Sule : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) कवठेमहांकाळ (kavathe mahankal) आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या भीमराव सूर्यवंशी (bhimrao suryavanshi) यांनी आत्महत्या केली. वेतन वेळेत न मिळाल्याने सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान सूर्यवंशी यांची आत्महत्या ही दुर्देवी घटना असल्याचे नमूद करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी ट्विट (tweet) करीत या घटनेला राज्य सरकारला (maharashtra governement) जबाबदार धरलं आहे.
भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाचे रहिवासी. आज (गुरूवार) पहाटे त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच कवठेमहंकाळ पोलिस घटनास्थळी पाेहचले. त्यांनी सूर्यवंशी यांचा मृतदेह कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात (hospital) शवविच्छेदनासाठी पाठविला. (Maharashtra News)
या घटनेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. कवठेमहांकाळ येथे कार्यरत असणारे एसटी चालक भीमराव सूर्यवंशी यांनी वेळेवर पगार होत नसल्याच्या कारणावरुन आत्महत्या केली. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करुन सत्तेत बसलेल्या ईडी (ED) सरकार या कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार करण्यात देखील अपयशी ठरल्याचे सुळेंनी म्हटलं आहे.
या गरीब, कष्टाळू आणि संवेदनशील कर्मचाऱ्यांच्या भावनांचा या सरकारने अक्षरशः खेळ मांडला आहे. हे अतिशय संतापजनक आहे. ईडी सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आणि नियमित करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील खासदार सुळेंनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.