वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापलं. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून ५ आरोपींना अटक केली आहे. मात्र, सहावा आरोपी अद्याप फरार आहे. सहाव्या आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अशातच सहावा आरोपी म्हणजेच निलेश चव्हाणबाबत मोठी बातमी समोर येत आहे. निलेश चव्हाण याच्या पुणे येथील घरावर मध्यरात्री पुणे पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत चव्हाणचा लॅपटॉप आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या असून, त्याला पोलिस स्टेशनला हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.
वैष्णवी मृत्यूप्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. कस्पटे कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्याचं बाळ काही काळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं. याच दाव्याच्या अनुषंगाने पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात चव्हाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून, पोलिसांनी उशिरा रात्री त्याच्या घरावर छापा टाकत त्याच्या काही वस्तू जप्त केल्या आहेत.
छापेमारी दरम्यान, पोलिसांनी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि त्याच्या इतर वस्तू पोलिसांनी जप्त केले आहेत. याद्वारे बाळासोबतच्या काळातील संपर्क, संवाद आणि शक्य तितकी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही माहिती आता फॉरेन्सिक तपासासाठी दिली जाण्याची शक्यता आहे.
आरोपी निलेश अद्याप फरार
वैष्णवीच्या मृत्यूनंतर कस्पटे कुटुंबियांनी बाळाला परत आणण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी निलेश चव्हाण याच्याकडे बाळ असल्याचं समजल्यावर ते चव्हाणच्या घरी गेले. तिथे चव्हाण याने कस्पटेंना बंदुकीचा धाक दाखवला. तसेच 'तुमचा आणि बाळाचा काहीही संबंध नाही, येथून चालते व्हा', अशी धमकी दिली. यानंतर निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणातील सखोल तपासाचे आदेश दिलेले असतानाही, वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा दाखल झाल्यानंतरही चव्हाण फरार आहे. या प्रकरणात आता पोलिसांकडून तपास वेगाने होणार असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.