Mumbai Goregaon News Saam TV
मुंबई/पुणे

Shocking News : मुंबई हादरली! बंद कारमध्ये आढळलं नवजात बाळ, VIDEO व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

Mumbai Goregaon News : गोरेगावमध्ये पार्क केलेल्या व्हॅनमध्ये नवजात बाळ सापडल्याने परिसर हादरला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली असून बाळ सुरक्षित आहे. पोलिसांकडून पालकांचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

गोरेगावमध्ये पार्क व्हॅनमध्ये पोलिसांना नवजात बाळ सापडले

निर्भया पथकाच्या मदतीने बाळावर तातडीने उपचार करण्यात आले

डॉक्टरांनी बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले आहे

पोलिसांकडून बाळाच्या पालकांचा शोध सुरू आहे

मुंबईतून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. गोरेगावमध्ये पार्क केलेल्या व्हॅनमध्ये पोलिसांना नवजात बाळ आढळले आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली. पोलीस या बाळाच्या आईवडिलांचा शोध घेत असून या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलने शेअर केली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्रीच्या सुमारास बीट मार्शल परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान त्यांना रस्त्याच्या एका मंद प्रकाशाच्या भागातून जोरजोरात रडण्याचे आवाज ऐकू आले. पोलिसांनी आवाजाच्या दिशेने वाटचाल केली असता त्यांच्या लक्षात आले की हा आवाज तिथे पार्क केलेल्या गाडीतून येत आहे.

घटनास्थळी अधिक तपास केला असता त्यांना कापडात गुंडाळलेले बाळ उघड्यावर सोडलेले आढळले. या घटनेनंतर पोलिसांनी आजूबाजूला शोधाशोध केली असता रात्रीच्या काळोखात तिथे कोणीच सापडले नाही. तातडीने कारवाई करत, अधिकाऱ्यांनी निर्भया पथकाच्या मदतीने नवजात बाळाला वैद्यकीय सेवेसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी ताबडतोब उपचार केले आणि बाळ सुरक्षित आणि स्थिर असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलने शेअर केली. डॉक्टरांच्या आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर बाळाला सोडण्यात आले. निर्भया पथकाच्या मदतीमुळे, बाळाला नंतर अंधेरी (पश्चिम) येथील सेंट कॅथरीन होम येथे सोपवण्यात आले. ही बालसंगोपन संस्था सोडून दिलेल्या आणि अनाथ मुलांची काळजी घेते.

दरम्यान पोलीस या बाळाच्या आईवडिलांचा शोध घेत असून पोलिसांनी बाळाला सोडून देण्याशी संबंधित पालकांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र या बाळाला इथे सोडण्यामागचं नेमकं कारण काय ? आणि त्याचे आई वडील नक्की कोण आहेत ? हे अनुत्तरित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parineeti Chopra: 'सगळ्यात बेस्ट आईला...', राघव चड्ढा यांनी परिणीती चोप्राला खास स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Bhau beej History: बहिण भावाच्या नात्याचा सण 'भाऊबीज' 'दिवाळीत का साजरा केला जातो? कारण कोणालाच माहित नाही

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टँकरमधून ऑइल गळती, सटासट २२ दुचाकी घसरल्या, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT