Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

Maharashtra Scholarship Exam 2025 : महाराष्ट्र शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे. २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून परीक्षा आता इयत्ता ४ वी आणि ७ वी साठी होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता परीक्षा घेण्याची पद्धत बदलली असून, २०२६ पासून इयत्ता ५वी आणि ८ वीऐवजी ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. यंदाच्याच शैक्षणिक सत्रापासून या नव्या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्रतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता ४थी आणि ७ वीसाठी घेतली जात होती. मात्र २०१६-१७ पासून आरटीई कायद्यानुसार या परीक्षांच्या स्वरूपात बदल करण्यात आला होता आणि ती ५ वी आणि ७ वीच्या विद्यार्थासाठी लागू करण्यात आली.

तथापि, या शैक्षणिक बदलांमुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घेतल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळेच शिक्षणमंत्रीनी पूर्वीप्रमाणेच इयत्ता ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुधारित परीक्षा पद्धत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com