महाराष्ट्राच्या राजकारणातलं नवं शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या नव्या घराचं उद्घाटन... Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्राच्या राजकारणातलं नवं शिवतीर्थ! राज ठाकरेंच्या नव्या घराचं उद्घाटन...

महाराष्ट्रात शिवतीर्थ म्हणजे शिवसेना असं समीकरणंच होतं. मात्र आता राज्याच्या राजकारणात आणखी एक शिवतीर्थ स्थापन झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Cheif Raj Thackeray) यांनी आज भाऊबाजेच्या मुहुर्तावर दादरमधील त्यांच्या नव्या घराचं उद्घाटन केलंय. (Raj Thackeray's New House) सध्या ते राहत असलेल्या त्यांच्या कृष्णकुंज (KrushaKunj) या बंगल्याशेजारीच एक नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. हीच इमारत म्हणजे राज ठाकरेंच नवं घर होय. पण राज ठाकरेंच्या घराची चर्चा ही आलिशान असण्यावरुन नाही तर त्याच्या नावावरुन होत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या घराला "शिवतीर्थ" (ShivTirtha) असं नाव दिलयं. (New ShivTirtha in Maharashtra politics! Inauguration of Raj Thackeray's new house)

हे देखील पहा -

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) याअगोदर एकाच शिवतीर्थाचा प्रामुख्याने उल्लेख व्हायचा, ते शिवतीर्थ म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क. शिवसेनेच्या (Shivsena) स्थापनेपासून जेव्हापासून या मैदानावर शिवसेनेच्या सभा होऊ लागल्या तेव्हापासून शिवसैनिक या मैदानाला शिवतीर्थ म्हणू लागले. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावाही याच मैदानात (Shivaji Park, Dadar) होत असतो. एकुणच महाराष्ट्रात शिवतीर्थ म्हणजे शिवसेना असं समीकरणंच होतं. मात्र आता राज्याच्या राजकारणात आणखी एक शिवतीर्थ स्थापन झाल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांनी आज आपल्या नव्या घराचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या हस्ते नव्या घराची पुजा संपन्न झाली. या आलिशान इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे. तसंच याच इमारतीत पक्षाचं कार्यालयही असेल. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी आयोजित करण्यात येतील. सोबतच या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे. एकुणच राज ठाकरेंचं नवं घर सर्व सोयी-सुविधांनी युक्त असं असेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात जितकं महत्व मातोश्री, सिल्व्हर ओक, वर्षा या बंगल्यांना आहे तिककंच महत्व कृष्णकुंजलाही आहे. मात्र राज ठाकरेंनी आता आपल्या नव्या घराचं नाव शिवतीर्थ ठेवून शिवसेनेला आव्हान दिलंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर अनेक निर्णय त्यांनी कृष्णकुंज या निवास्थानी घेतले. मात्र आता मनसैनिकांना आपल्या राजाचे आदेश हे कृष्णकुंजऐवजी शिवतीर्थाहून मिळणार आहे.

शिवसेनेने भाजपशी असलेली पारंपारिक युती तोडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार स्थापन केल्याने शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात येता. तर दुसरीकजे भाजप आणि मनसे यांची (BJP-MNS) अधीकृत युती नसली तरी या दोघांचाही सर्वात मोठा राजकीय शत्रु शिवसेनाच आहे. तसेच हिंदुत्वाच्या (Hindutva Politics) मुद्दयावरुन नाराज झालेल्या शिवसैनिकाला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न मनसे करतेय. याअगोदर पक्षाचा झेंडा पुर्ण भगवा करण्यात आता आणि आता नव्या घराचं नाव शिवतीर्थ असं ठेवण्यात आलं. या आणि अशा अनेक संदर्भांवरुन मनसे आता ब्ल्युप्रिंटपेक्षा जास्त भगव्या राजकारणाकडे वळली आहे असेच दिसते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT