रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या, पाडव्याचा सण आणि औक्षण... पहा पवार कुटुंबियांचं प्रेम!

काल दिपावली पाडव्याच्या दिवशी शरद पवार, अजित पवार, रोहित पवार आणि सदानंद सुळे यांचे औक्षण केले गेले. सुप्रिया सुळेंनी या क्षणांचे व्हिडिओज शेयर केले आहेत.
रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या, पाडव्याचा सण आणि औक्षण... पहा पवार कुटुंबियांचं प्रेम!
रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या, पाडव्याचा सण आणि औक्षण... पहा पवार कुटुंबियांचं प्रेम!twitter/@supriya_sule
Published On

पुणे: दिवाळी सण (Diwali Festival) हा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हवा-हवासा वाटतो. सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी हा सण उत्साहात साजरा करतात. यात राजकारणीही (Politicians) मागे नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाकारणातलं महत्वाच्या अशा पवार कुटुंबियांनाही (Pawar Family) दिवाळी सण उत्साहात साजरा केला. काल दिपावली पाडव्याच्या (Dipavli Padva) दिवशी शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), रोहित पवार (Rohit Pawar) आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांचे औक्षण केले गेले. सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) या क्षणांचे व्हिडिओज शेयर केले आहेत. (Padva festival and pawar family see the love of Pawar family!)

हे देखील पहा -

बारामतीच्या (Baramati) खासदार सुप्रिया सुळे हे सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टीव्ह असतात. राजकारणासह ते कौटुंबिक आणि दैनंदिन आयुष्याबाबतही सोशल मीडियावर बोलत असतात. यावेळीही त्यांनी त्याच्या कुटुंबातले खास क्षण शेयर केले आहेत. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने बारामतीमध्ये त्यांनी त्यांचे पती सदानंद सुळेंचे औक्षण केले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे औक्षण त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी केले.

राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे औक्षण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केले. "अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी ही जोडी आमची अखंड उर्जा"असं कॅप्शन सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.

बारामतीच्या खासदार सुप्रिया पवार-सुळे यांनी त्यांचे पती सदानंद सुळे यांचं औक्षण केलं. यावेळी "रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या पाडव्याचा हा सण" असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांचं औक्षण त्यांच्या पत्नी कुंती पवार यांनी केलं आहे.

काल दीपावली पाडवा साजरा केल्यानंतर आज भाऊबीजही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. "प्रेम, स्नेह आणि आपुलकीच्या बंधनाने बहीण-भावाचे अनमोल नाते वृद्धिंगत व्हावे, या सुंदर नात्यातील विश्वास व गोडवा चिरंतन राहावा, ही मनोकामना." अशा शुभेच्छा शरद पवारांनी दिल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com