LPG Crisis saam tv
मुंबई/पुणे

LPG : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त ९६ तासात एलपीजी सिलिंडर घरपोच होणार, अट फक्त एकच

Pune LPG cylinder delivery news : पुण्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर उपाय म्हणून आता फक्त ९६ तासांत घरपोच गॅस सिलेंडर मिळणार आहे. OTP प्रणालीद्वारे वितरण बंधनकारक करण्यात आले असून नागरिकांना रांगा लावण्याची गरज नाही.

Namdeo Kumbhar

LPG shortage Maharashtra Pune update : आखाती देशातील युद्धाची धग महाराष्ट्रात बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुणे-मुंबईसह राज्यभरात गॅस सिलिंडरसाठी रांगा लागल्या आहेत. पण आता पुणेकरांना दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. पुणेकरांना घरगुती गॅस सिलिंडर फक्त ९६ तासांत घरपोच मिळणार आहे. त्यासाठी फक्त एटीपीची गरज लागेल, पुणे जिल्हाधिकारी जितंद्र डुडी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहे.

गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या तेल कंपन्या व वितरकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलिस प्रशासनालाही देण्यात आले आहेत.

घरगुती गॅस सिलेंडर घरीच मिळणार, रांगा झाल्या कमी, परिस्थती पूर्व पदावर?

घरगुती गॅस सिलिंडरसाठी कोणीही रस्त्यावर रांगा लावू नये कारण या सिलेंडर घरपोच मिळेल त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही असा आवाहन पुणे जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर आज सकाळपासूनच गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तिला सहा दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर सिलेंडर खरेदी करण्यासाठी रस्त्यावर रांगा लावत होते. मात्र काल झालेल्या बैठकीनंतर रस्त्यावर कोणीही रांगा लावणे असा शासन आदेश जारी केला गेला. त्यामुळे वितरकांच्या बाहेर येणाऱ्या नागरिकांना तुम्हाला गॅस सिलेंडर घरपोच मिळेल त्यामुळे रस्त्यावर लाईन लावू नका असं समजावून सांगत आहेत.

गॅस सिलिंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार

घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार असून गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या गोदाम किंवा कार्यालयाबाहेर “गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच ९६ तासांच्या आत घरपोहोच करण्यात येईल” असा आशय दर्शविणारे फलक लावावेत, असे निर्देशही देण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर “गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच ९६ तासांच्या आत घरपोहोच करण्यात येईल, तरी गॅस एजन्सीसमोर गर्दी करू नये” असा संदेश (SMS) पाठवावा, असेही सांगण्यात आले. याशिवाय ग्राहकांनी घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत घरपोहोच वितरण करणे बंधनकारक राहील, असे निर्देश गॅस वितरकांना देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT