ATM मध्ये पैसे भरायला गेलेली व्हॅन घेऊन ड्रायव्हर फरार; ८२ लाख गायब! SaamTVNews
मुंबई/पुणे

ATM मध्ये पैसे भरायला गेलेली व्हॅन घेऊन ड्रायव्हर फरार; ८२ लाख गायब!

एकूण २ कोटी रूपये पेटी मध्ये घेऊन कर्मचारी आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

~ सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतील उलवे येथे ATM मशीन मध्ये पैसे भरायला गेलेली व्हॅन घेऊन ड्रायव्हर गायब झाल्याची घटना घडली आहे. उलवे (Ulwe) सेक्टर १९ मधील बॅंक ॲाफ इंडियाच्या (Bank Of India) एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी सिक्युरिटी व्हॅन आली होती. एकूण २ कोटी रूपये पेटी मध्ये घेऊन कर्मचारी आले होते. यातील १ कोटी १८ लाख रूपये कर्मचाऱ्यांनी पेटीतून काढून ATM मध्ये भरण्यास सुरवात केली. (new mumbai ulwe driver absconded with van went to pay at ATM; 82 lakh missing)

हे देखील पहा :

त्यावेळी व्हॅन (Van) मध्ये कोणीच कर्मचारी नसल्याचे पाहून व्हॅनचा ड्रायव्हर संदीप दळवी याने व्हॅन घेऊन पळ काढला. गाडीत असलेल्या पेटीत ८२ लाख रूपये शिल्लक होते. आरोपी संदीप दळवी याने उलवे वरून गाडी सीबीडी (CBD) येथील अपोलो हॅास्पीटल जवळ आणत तिथेच सोडून दिली. गाडीतील ८२ लाख रूपये लंपास करून आरोपी फरार झाला आहे. सदर प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात (NRI Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्त्यावर लागलेल्या सीसीटीव्ही च्या साहाय्याने आरोपीचा शोध सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT