Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाला अखेर शुक्रवारी नवीन मुख्य न्यायमूर्ती मिळाले आहे. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांनी न्यायमूर्ती आर.डी धानुका यांची ४६ वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. धानुका हे ४ दिवसांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या न्यायाधीशांचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ असणार आहे. (Breaking Marathi News)
आर. डी धानुका यांचा रविवारी राजभवनात शपथविधी होणार आहे. न्यायमूर्ती रमेश धानुका यांची २३ जानेवारी २०१२ रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते ३० मे २०२३ रोजी निवृत्त होणार आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६२ वर्ष इतकं असतं.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) कॉलेजियमने एप्रिल रोजी न्यायमूर्ती धानुका यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस केली होती.गेल्या वर्षी ११ डिसेंबर रोजी माजी सरन्यायाधीश दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती. त्यामुळे गेल्या ५ महिन्यांहून अधिक काळ उच्च न्यायालयात न्यायमूर्तीविना होते. (Latest Marathi News)
त्यानंतर ज्येष्ठ न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती पुष्टी करणारी अधिसूचना देखील जारी करण्यात आली. त्यामुळे गंगापूरवाला हे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरून २३ मे २०२४ रोजी निवृत्त होणार आहेत.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती धानुका म्हणाले, "मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून चार दिवस काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबई बार असोसिएशनने उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी त्यांना निरोप दिला".
"मी उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती म्हणून एक दशकाच्या शेवटी नियुक्त झालो आहे, तुमच्या योजना काय आहेत? हे मला विचारले गेले आहे. त्यामुळे गेल्या २-३ महिन्यांपासून मला एक एसएमएस दिसून येतो, मला कॉल सेंटरमध्ये ३५० रुपयांच्या पार्ट टाइम जॉबची ऑफर आधीच देण्यात आली आहे,” असे ते मिश्किलपणे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.