Ganeshotsav 2023: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तींवर बंदी घालू नका; CM शिंदेंच्या भूमिकेला भाजप नेत्याचा विरोध!

Ashish Shelar Advoice CM Eknath Shinde: मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
Ashish Shelar Advoice CM Eknath Shinde On Mumbai Ganeshotsav 2023
Ashish Shelar Advoice CM Eknath Shinde On Mumbai Ganeshotsav 2023Saam TV

Ashish Shelar Advoice CM Eknath Shinde: मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. गणेशोत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा मोठा पारंपरिक उत्सव आहे. यासाठी लागणाऱ्या पीओपी मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे राज्य सरकारच्यावतीने नेमण्यात आलेल्या तांत्रिक समितीचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत पीओपीच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालणं अशास्त्रीय, असंविधानिक आणि अयोग्य ठरेल, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.  (Breaking Marathi News)

Ashish Shelar Advoice CM Eknath Shinde On Mumbai Ganeshotsav 2023
Devendra Fadnavis News: प्रकाश आंबेडकर अधून मधून चांगला सल्ला देतात; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघ आणि मुंबईतील मूर्तिकार संघटनेच्या प्रतिनिधींची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आज बैठक झाली. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गेल्या आठवड्यामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या बाबतीत जे निर्णय घेतले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत.

मात्र, पीओपीच्या चार फुटाखालील गणेश मूर्त्यांवर बंदी घालण्यासंदर्भात भूमिका मुंबई महापालिकेकडून घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. त्याला आमचा विरोध आहे. मुंबई महापालिकेने समुद्र स्वच्छ होण्यासाठी, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी योग्य यंत्रणा का निर्माण केली नाही? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

"घरातून निघणाऱ्या सांडपाण्याने वर्षानुवर्षे मुंबईतील समुद्र खराब होत असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याबाबत २५ वर्ष महापालिकेतील सत्ताधारी झोपले होते काय? असा सवाल करत आज गणपतीच्या (Ganeshotsav 2023) मुर्त्यांमुळेच जणूकाही समुद्र आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतोय असे भासवले जात आहे. या गोष्टी आम्हाला कदापि मान्य नाहीत. आमची भूमिका सरकारपुढे मांडली आहे", असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

Ashish Shelar Advoice CM Eknath Shinde On Mumbai Ganeshotsav 2023
Police Bharti 2023: पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्या; नाना पटोलेंच CM शिंदेंना पत्र

राज्य सरकारच्या वतीने पीओपी मूर्तीच्या वापराबद्दल जी समिती नेमण्यात आली आहे त्याबद्दल बोलताना आशिष शेलार म्हणाले, "ज्यांनी याबद्दलचा प्रयोग शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केला आहे अशा शास्त्रज्ञांना समितीत घ्यावे याबाबतची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करणार आहे. अलीकडेच रामनवमी, हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये अनुचित प्रकार घडवण्याचा प्रकार काहीजणांनी केला. पोलिसांनी त्यांना पकडले". (Latest Marathi News)

"गणेशोत्सव विसर्जनाचा मार्ग ठरलेला आहे. त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत काटेकोर अंमलबजावणी व्हावी; तसेच गणेशोत्सवामध्ये कुठल्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य न वापरता रात्री दहा नंतर काहीकाळ आरत्या सुरू राहिल्या तर त्यात बिलकुल अडकाठी आणता कामा नये अशीही आमची मागणी आहे.राज्य सरकारने त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ते निर्देश दिले आहेत. त्याबाबत आम्ही समाधानी आहे", असेही आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com