Uddhav Thackeray Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

NEET Result Scam : 'नीट' घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, CBI चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्या; ठाकरे गटाची मागणी

Satish Daud

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या NEET परीक्षेत घोटाळा झाल्याची सध्या देशभरात चर्चा आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष असून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखो रुपयांची बोली लागली, असा आरोप 'सामना'तून करण्यात आलाय.

देशात गेली काही वर्षे सर्वत्र फोडाफोडीचेच राज्य सुरू आहे. सरकारे फोडली गेली, पक्ष फोडले गेले. नेते व आमदार, खासदार फोडले गेले. नोकरभरतीच्या परीक्षांचे पेपर कायमच फोडले जात आहेत व आता तर या फोडाफोडीच्या यादीमध्ये वैद्यकीय प्रवेशांसाठीच्या ‘नीट’ परीक्षेचाही समावेश झाला आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

"सरकार व आमदार-खासदारांच्या फोडाफोडीसाठी जसा ‘व्हाया सुरत’ ‘गुजरात पॅटर्न’ वापरला गेला, त्याच धर्तीवर ‘नीट’ परीक्षेचा पेपर फोडण्यासाठी ‘व्हाया गोध्रा’ हा नवीन गुजरात पॅटर्न वापरण्यात आला. ‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्याचे ‘गुजरात कनेक्शन’ भयंकर चीड आणणारे आहे", असा संताप अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलाय.

"गुजरातच्या गोध्रा शहरातील जय जलाराम स्कूल या शाळेमधील ‘नीट’ परीक्षेचे केंद्र मिळवण्यासाठी तर तब्बल 10 लाख रुपयांची बोली लागली होती. कारण ‘नीट’चा पेपर फोडून जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याची जबाबदारी वडोदरा येथील एका कोचिंग क्लासेसच्या संचालकाने घेतली होती", असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

"परशुराम रॉय हा कोचिंग सेंटरचा संचालक व जय जलाराम शाळेतील शिक्षक तुषार भट्ट या दोघांनी मिळून ‘नीट’ परीक्षेत अव्वल गुण मिळवून देण्याचे दुकानच गोध्रा येथे थाटले होते. ‘नीट’मधील यशाच्या हमीचा पैसे फेकून उपलब्ध झालेला हा गुजरातमधील शॉर्टकट एजंटांमार्फत देशातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला", असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला.

"उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आणि चंदिगढच्या महापौर निवडणुकीत ज्याप्रमाणे ‘ग्रेस’ देऊन मत-घोटाळा करण्यात आला, त्याच पद्धतीने ‘नीट’ परीक्षेतही ‘ग्रेस’च्या माध्यमातून वाढीव गुणांचा घोटाळा करण्यात आला", असंही सामना अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे.

"‘नीट’ परीक्षेतील महाघोटाळ्याची व्याप्ती बघता आधीची परीक्षा रद्द करून ही संपूर्ण परीक्षाच आता नव्याने घ्यायला हवी. पेपरफुटीचा ‘गुजरात पॅटर्न’ आणि उदंड टॉपर देणाऱ्या परीक्षेतील एकूणच भानगडींची सीबीआय चौकशी करून ‘नीट’च्या लाखो विद्यार्थ्यांना न्याय दिलाच पाहिजे",अशी मागणी देखील सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT