NEET exam  saam tv
मुंबई/पुणे

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई, महाराष्ट्रातून आणखी दोघांना बेड्या

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली. या प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्रातून आणखी दोघांना अटक केली आहे. पुणे आणि अहिल्यानगर येथून एक महिला आणि एका पुरूषाला बेड्या ठोकण्यात आल्या.

Priya More
  • नीट पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली

  • या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली

  • महाराष्ट्रातून आणखी दोघांना अटक करण्यात आली

  • पुणे आणि अहिल्यानगरमधून दोघांनाा अटक

सागर आव्हाड, पुणे

नीट पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील विद्यार्थी चिंचेत आले आहेत. नीट परीक्षेतील कथित पेपर फूट आणि अनियमिततेच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने आपली कारवाई तीव्र केली आहे. गेल्या २४ तासांत सीबीआयने महाराष्ट्रातील पुणे आणि अहिल्यानगर येथून २ नवीन आरोपींना अटक केली. देशभरातील १४ विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आज केलेल्या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून मनिषा वाघमारे आणि अहिल्यानगर येथून धनंजय लोखंडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास १२ मे २०२६ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या तक्रारीनंतर सुरू करण्यात आला होता.

यापूर्वी या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली होती ज्यामध्ये जयपूरमधून तीन, गुरुग्राममधून एक आणि नाशिकमधून एकाचा समावेश होता. आज या पाचही आरोपींना दिल्लीतील सक्षम न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्यांना पुढील चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा सीबीआयकडून देशव्यापी तपास सुरू आहे. सीबीआयच्या विशेष पथकांकडून देशभरात ही कारवाई राबवली जात आहे. केवळ अटकच नाही तर या प्रकरणाशी संबंधित अनेक संशयितांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान, महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सीबीआयने या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सर्वसमावेशक तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील या मोठ्या गैरव्यवहारामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे रॅकेटमधील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतात लॉकडाऊन लागणार? इंधन संकटामुळे देश ठप्प होणार?

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील अमनोली गावाजवळील पूल कोसळला, चार ते पाच गावांचा संपर्क तुटला

Ashok Kharat Case: उपजिल्हाधिकारीचं निलंबन; भोंदू बाबा खरात प्रकरणाशी काय आहे कनेक्शन?

New CGHS Rule: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन मेडिक्लेम नियम, आई-वडील किंवा सासू-सासरे; नंतर निर्णय बदलता येणार नाही

Government Employees: सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशी दौऱ्यावर निर्बंध, वर्षभर प्रवास करता येणार नाही

SCROLL FOR NEXT