Jayant Patil vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Jayant Patil: जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले, आता गणपती दर्शन संपेल त्यामुळे...

'यंदा हिंदू सर्व सण उत्साहात साजरे होत आहेत. ते कोरोनाचे विघ्न टळल्यामुळे साजरे करत आहेत.

Jagdish Patil

रश्मी पुराणिक -

मुंबई: बाप्पा गेल्यावर गणपती दर्शन संपेल त्यामुळे आता बळीराजाला मदत मिळायला हरकत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे.

आज राज्यभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत आहेत. कोरोना संकटामुळे जवळपास दोन वर्षांपासून न निघालेल्या विसर्जन मिरवणुका यंदा जल्लोषात सुरु आहेत. अनेक राजकीय नेतेमंडळी देखील विसर्जन मिरवणुकीला भेट देत आहेत.

पाहा व्हिडीओ -

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, 'यंदा हिंदू सर्व सण उत्साहात साजरे होत आहेत. ते कोरोनाचे विघ्न टळल्यामुळे साजरे करत आहेत. तसंच बाप्पा निघाले आहेत, महाराष्ट्रात अधिक सौख्य भरभराटी राहो, गणराया बुध्दीचा देवता आहे, त्याच्याकडून सर्वांना सुबुद्धी मिळो अशी मागणी त्यांनी गणरायाला केली.

यावेळी बोलताना पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला, अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) ठिकठिकाणी पूर आला आहे, अजूनही शेतकऱ्यांना सरकारची केवळ घोषणा झाल्या पण, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना (Farmer) मदत मिळाली पाहिजे. शिवाय आता गणपती बाप्पा निघालेत, गणपती दर्शन संपेल त्यामुळे बळीराजाला मदत मिळायला हरकत नाही असा टोला त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरु झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधील गणेश मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. त्यांनी जवळपास १५० ते २५० गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या. गणेश दर्शनासाठी ते पुण्यात देखील आले होते. त्यांच्या या गणेश मंडळांना भेटी देण्याच्या कार्यक्रमावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. अशातच आता जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT