Anant Chaturdashi: जर्मनी, युरोपच्या झेंड्यांसमोर फडकवला भगवा; परदेशातही धुमधडाक्यात बाप्पाचा विसर्जन सोहळा

मुंबई-पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठीच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळंत आहे.
Anant Chaturdashi 2022
Anant Chaturdashi 2022Saam TV
Published On

Anant Chaturdashi 2022 : आज अनंत चतुर्दशी या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पाला आज साश्रू नयनांनी निरोप देत आहे. श्री गणेश चतुर्थीला जल्लोषात आगमन झालेल्या गणपतींचे आज जंगी मिरवणुका काढत विसर्जन केलं जातं आहे. (Ganeshostav) गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..., अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे.

मुंबई-पुण्यासह (Mumbai Punne) राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठीच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळंत आहे. मात्र, गणपती बाप्पाची भक्ती सातासमुद्रापार देखील करतात. अशाच जर्मनीमधील गणेशभक्तांनी ढोल ताशाचा गजरात बाप्पाची मिरवणूक काढली आहे.

पाहा व्हिडीओ -

जर्मनीतील एरलांगन शहरात (City of Erlangen) पहिल्यांदाच ढोल, ताशाच्या गजरात आणि शेकडो भारतीय (Indian) नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. मराठी विश्व फ्रांकेन जर्मनी तर्फे आयोजित केलेल्या या मिरवणुकीत अठरा जणांच्या ढोल, ताशा व झांज पथकासोबत ३८ महिला व पुरुष गटाने लेझीम नृत्य सादर केलं.

तर छोट्या मुलांनी थोर भारतीय महापुरुषांची वेशभूषेत देखावे सादर करत उपस्थितांना मिनी इंडियाचे दर्शन घडवलं आहे. विशेष म्हणजे विसर्जनचा हा कार्यक्रम एरलांगन राटहाऊस म्हणजे तेथील सरकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने प्रथमच जर्मनी आणि युरोपचा झेंडा जिथे कायम उंचावर फडकतो तिथे आपला भगवाही फडकला.

Anant Chaturdashi 2022
Queen Elizabeth II Death: राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर हे '५४' देश आपला राष्ट्रध्वज झुकवणार, त्यामागे आहे 'हे' कारण

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जर्मन स्थित सर्व भारतीयांनी मनापासून सहकार्य केले आणि या सहकार्यास जर्मनीच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात जवळपास आठशे लोकांनी सहभाग नोंदवला होता. हे घडवून आणल्याबद्दल मराठी विश्व फ्रांकेन मंडळाचे संस्थापक रश्मी गावंडे,तृप्ती सपकाळ, अमोल कांबळे, प्रशांत गुळस्कर यांचे खूप कौतुक आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com