NCP Viral BhagatSingh Koshyari Marksheet
NCP Viral BhagatSingh Koshyari Marksheet Saamtv
मुंबई/पुणे

NCP: राष्ट्रवादीने कोश्यारींना जाता जाता डिवचले, मार्कशीट व्हायरल; इतिहासात भोपळा, मात्र 'या' विषयात १००...

Rashmi Puranik

Mumbai: राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कारकिर्द चांगलीच वादग्रस्त राहिली होती. महापुरूषांचा अवमान केल्या प्रकरणी ते विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले होते. वारंवार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अडचणीत सापडले होते. ज्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

 आता राज्यपालांनी स्वेच्छेने दिलेला राजीनामा मंजूर झाला आहे. मात्र कोश्यारी यांना जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच टोला लगावला आहे. भगतसिंह कोश्यारी यांची एक उपहासात्मक मार्कशीट तयार करण्यात आली आहे.(Bhagat Singh Koshyari)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शनिवारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शपथ घेतील. त्याआधी भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यावर टीका करणारे प्रगतीपुस्तक राष्ट्रवादीकडून काढण्यात आले आहे.

अधोगतीपुस्तक असे नाव दिलेल्या पुस्तकात राज्यपालांची मार्क, त्यांचा नंबर, तसेच त्यांची तुकडी अशी शैक्षणिक माहिती देण्यात आली आहे.

या पुस्तकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तुकडी ढ असल्याचं मार्कशीटवर नमूद करण्यात आले आहे. तर हजेरी क्रमांक ४२* असे दाखवण्यात आले आहे. इतिहास विषयात भोपळा, भूगोलात ३५, नागरिक शास्त्रात १७ , सामान्य ज्ञानात ३४ तर कला विषयात त्यांना १०० पैकी शंभर मार्क देण्यात आले आहेत.

राज्यपालांनी महाराष्ट्रातील इतिहास पुरुषांवर केलेल्या भाष्यांवरून त्यांना इतिहासात ०० गुण देण्यात आले. व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आलेल्या या मार्कशीटमध्ये शेराही देण्यात आलाय. सदर विद्यार्थ्याीच बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता, याची सुरुवात बालवाडीपासूनच सुरु करणे योग्य राहील, अशा शब्दात डिवचण्यात आले आहे.

मुख्याध्यापकांना पत्रही लिहले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या संदेशात एक पत्रही आहे. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहिलेले हे पत्र असल्याचं अत्यंत खुमासदार पद्धतीने यात दाखवण्यात आले आहे.

आमच्या शाळेतील भगतसिंह कोश्यारी नामक विद्यार्थ्याला तत्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्यांची गच्छंती करण्यात येत आहे. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Voting: मतदान केंद्रापासून 100 मीटरवर असताना जागीच कोसळले! मतदानासाठी जात असतानाच काळाचा घाला

Kolhapur: हिरण्यकेशी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Arvind Kejriwal News: १०० चे १००० कोटी कसे झाले? अरविंद केजरीवाल यांच्या कारवाईवरुन सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल; सुनावणीत काय घडलं?

Live Breaking News : अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Rajendra Gavit News | शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश,फडणवीसांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT