NCP Shiv swarajya Yatra Pune: Saamtv
मुंबई/पुणे

Jayant Patil Speech: 'विधानसभेला किती जागा जिंकणार?' जयंत पाटलांनी फिक्स आकडा सांगितला; 'शिवस्वराज्य' यात्रेतून महायुतीवर बरसले; अमोल कोल्हेंनी सभा गाजवली

NCP Shiv swarajya Yatra Pune: आज शिरुर-हवेली मतदार संघात ही शिवस्वराज्य यात्रा पोहोचली असून अष्टापूर फाटा येथे जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

रोहिदास गाडगे

पुणे, ता. १० ऑगस्ट २०२४

आगामी विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे राज्यभर दौरा करत आहेत. आज शिरुर-हवेली मतदार संघात ही शिवस्वराज्य यात्रा पोहोचली असून अष्टापूर फाटा येथे जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला...

"कसा खासदार होतो याचं उत्तर लिड देऊन जनतेने दिले आता आमदार कसा होतो बोलणा-यांनाही तसंच उत्तर द्या. संभाजी महाराजांच्या स्मारकाचे सहा महिन्यापुर्वी भूमीपुजन झाले मात्र सहा महिन्यात एक दगडसुद्धा उभा राहिला नाही. हाताला दुखापत झाली. वेदना होतात, मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शिवस्वराज्य यात्रा घेऊन जातोय, कारण शिरुर हवेलीला शरद पवार साहेबांनी शब्द दिलाय," असे म्हणत अमोल कोल्हे यांनी लाल दिव्याची अपेक्षा व्यक्त केली.

जयंत पाटलांचा गौप्यस्फोट...

"पुणे जिल्ह्यात अमोल कोल्हे अशोक पवारांनी खंबीर साथ दिली. शपथविधीला हजर असताना चुकीचा मार्ग न निवडता निष्ठा जपली. अमोल कोल्हेंना प्रचंड प्रलोभने होती. आकडे जर सांगितले तर तुम्ही म्हणाल आयुष्याचे भलं झालं असतं. अमोल कोल्हेंची किंमत मोजण्याचे प्रयत्न झाले त्यांनी ऐकलं नाही तर दम देण्याचा प्रयत्न झाला अगदी कुटुंबापर्यंत गेले." असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला.

लोकसभेत पैशाचा पाऊस..

"लोकसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस पडला. ७० ते ९० कोटी खर्च केले, एकाने तर १५० कोटी खर्च केले. हि लोकं काय व्यवसाय करत असतील? साताराला एका रुग्णालयात मेलेल्या माणसावर उपचार केले हे हॉस्पिटल भाजपाच्या ताब्यात आहे. मेलेल्या माणसांना पैसे देऊन घरी पाठविल्याचे प्रकार यांनी केले हा व्यक्ती राज्यातल्या प्रमुख नेत्याचा विश्वासू सहकारी आहे," असे म्हणत जयंत पाटलांनी आमदार गोरेंवर जोरदार टीका केली.

विधानसभेला किती जागा जिंकणार?

तसेच "विधानसभेला महाविकास आघाडी १७५ जागांवर विजय मिळणार आहे. - महाविकास आघाडीचा नेता कोण असं विचारतात? पण महायुतीचा नेता मुख्यमंत्री कोन हे विचारा एकमत झालं कि बघू. भाजपचा कोन मुख्यमंत्री होणार आणि दोन नेत्यांना मान्य होतय का पाहू?" असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

SCROLL FOR NEXT