Raj Thackeray : माझ्या वाटेला जाऊ नका, अन्यथा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray press conference : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गटाला थेट इशारा दिला आहे. माझ्या नादीला लागले तर विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
माझ्या वाटेला जाऊ नका, अन्यथा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray :Saam tv
Published On

जालना : 'माझ्या नादाला लागू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी जालन्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर जाहीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी थेट इशारा दिला.

राज ठाकरे म्हणाले,'लोकसभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधा मतदान झालं. ते तुम्हाळा मिळालं होतं. त्यांच्या प्रेम असल्यामुळे मतदान झालेलं नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आडून विधानसभेचं राजकारण सुरु आहे. ही बाब समोर यायला पाहिजे. शरद पवार यांच्या सारखे अनुभवी व्यक्ती महाराष्ट्रात मणिपूर होईल,असं वक्तव्य केले जात आहे.

'शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात पुढील तीन महिन्यात दंगली घडवायच्या आहेत. शरद पवारांचं राजकारण पाहिल्यास समजून येईल. दुसऱ्या जातीविषयी द्वेष निर्माण करणं, हे पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केल्यानंतर सुरु झालं, असा आरोप ठाकरेंनी केला.

माझ्या वाटेला जाऊ नका, अन्यथा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
VIDEO: सुपाऱ्या फेक, चले जावच्या घोषणा, गोंधळ आणि राडा! जरांगेंच्या बालेकिल्ल्यात Raj Thackeray यांच्या ताफ्यासमोर काय घडलं?

'माझ्या नादी कोणी लागू नये. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत. तर माझ्याकडे विस्थापित आहेत. समजात द्वेष निर्माण करून कशाप्रकारचे राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीसांचा विरोध असेल तर त्याविषयी बोला. पण समाजात कशाला तेढ निर्माण करता, असे राज ठाकरे म्हणाले.

माझ्या वाटेला जाऊ नका, अन्यथा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
Political News : उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय; बावनकुळे कडाडले

'शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत शब्द का टाकला नाही? जरांगे पाटलांच्या मागे राहून राजकारण कृज्ञतापूर्वक आहेत. माझे पोरं काय करतील सांगता येत नाही, घरात जाऊन गाल आणि पाठ पाहावी लागेल. अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.

आरक्षण का दिलं नाही?

मराठा समाजाचा आरक्षणासाठी मुंबईत पहिला मोर्चा निघाला. त्यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते होते. सर्वांनी एकमुखांनी सांगितलं की, मिळायला हवं. जर सर्वांनी एकमुखांनी सांगितलं तर तुम्हाला आडवलं कुणी? सर्वांचं एकमत असताना अडवलं कुणी? मागील १५ वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com