NCP party doors closed for Ajit Pawar and rebel MLAs Sharad Pawar big statement SAAM TV
मुंबई/पुणे

NCP Crisis News: अजित पवारांसह बंडखोर आमदार परत आल्यावर काय? शरद पवारांचं मोठं विधान

Ajit Pawar vs Sharad Pawar: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील बंडखोर आमदार परत आले तर, शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे.

Satish Daud

Ajit Pawar vs Sharad Pawar Latest News: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटातील नेते कधी एकमेकांचं कौतुक, तर कधी एकमेकांवर टीकास्त्र डागतांना दिसून येत आहे. अशातच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील बंडखोर आमदार परत आले तर, शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. (Latest Marathi News)

याबाबत खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्टीकरण देत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या गटाबाबत बोलताना मोठं विधान केलं.

"कळत नकळत आपल्यातील काही सहकारी हळूच एक शंका काढतात. आता झालंय ते ठीक आहे, आम्ही कामाला लागतोय, परंतु, ते परत आल्यावर काय? अशी शंका मला आजही अनेकांकडून विचारली जाते. ते आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपण यासंबंधीचे निर्णय घेणार नाही", असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

संकटाच्या काळात जे मजबुतीने उभे राहिले, ते खरे आणि त्यांच्या पद्धतीने निवडणुकीला जावे लागेल, असंही शरद पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदारांसाठी (Maharashtra Politics) आता राष्ट्रवादी पक्षात परतण्याचा मार्ग बंद झाला आहे, असा अंदाज अनेकांनी लावला आहे.

दरम्यान, 'इंडिया' नाव संविधानातून काढून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यातच G-20 च्या आमंत्रण पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रेसिडेंट ऑफ भारत असं नाव टाकल्यानंतर राजकीय वातावरण आणखीच तापलं आहे. केंद्राच्या या धोरणावरही शरद पवार यांनी जोरदार टीका केली. देशाचं नाव बदलण्याचा इतका अट्टाहास का? 'मग आता गेटवे ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँकेचे देखील नाव बदला. असं देखील शरद पवार म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

SCROLL FOR NEXT