Baramati , Supriya Sule, NCP, Dorlewadi
Baramati , Supriya Sule, NCP, Dorlewadi saam tv
मुंबई/पुणे

NCP : खासदार सुप्रिया सुळेंची शिष्टाई; एनसीपीतील दाेन गटाचा वाद मिटला

मंगेश कचरे

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) ह्या आज बारामती दौऱ्यावर असताना डोरलेवाडी येथे राष्ट्रवादीच्या (ncp) दोन गटांमध्ये रस्त्यावरून झालेल्या वादा नंतर खासदार सुळे यांनी रस्त्याच्या मार्गावर तोडगा काढण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले. खासदार सुळेंच्या भुमिकेमुळं सध्या तरी एनसीपीमधील दाेन गटांचा वाद मिटला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती लोकसभा दौऱ्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील तेरा गावांचा दौरा आयोजित केला होता. याच दौऱ्या दरम्यान डोरलेवाडी गावात ग्रामस्थांशी संवाद साधत असतानाच डोरलेवाडी गावात रस्त्यावरून गोंधळ झाला.

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत एक गट म्हणाला सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा. तर दुसऱ्या गटाने दहा मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले.

खासदार सुप्रिया सुळे आज गाव भेटीच्या दौऱ्यावर आल्यानंतर यासंदर्भात एका ग्रामस्थाने त्याची अडचण सांगितली आणि पाहता पाहता अनेक जण उठून यामध्ये स्वतःची भूमिका मांडू लागले. त्यातून गोंधळाला सुरुवात झाली. यानंतर खासदार सुळे यांनी सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.

त्यानंतर ग्रामस्थांची समजूत घालत यातील नेमका वाद समजून घेतला आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. यानंतर गोंधळ शांत झाला. दरम्यान याविषयीचा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरू होता. मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक ग्रामस्थाची बाजू समजून घेतली. त्यानंतर सर्वांना समजून देखील सांगितले. सर्व ग्रामस्थांना आश्वासित करुन सुळे पुढच्या दाै-यासाठी रवाना झाल्या.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal : सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेरील CCTV समोर; महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिसल्या स्वाती मालीवाल

Today's Marathi News Live: मुलुंड राडा प्रकरण : ५ शिवसैनिकांना अटक

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT