- अमर घटारे
Santosh Bangar Latest Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाचे आमदार संताेष बांगर (mla santosh bangar) यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी पाेलीसांनी अकरा शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्यांची चाैकशी करुन एकेकाला पाेलिसांकडून अटक (arrest) केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे रविवारी आपल्या कुटुंबासह अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे मठामध्ये देव दर्शनासाठी आले हाेते. त्या ठिकाणी अंजनगाव सुर्जी येथील काही शिवसैनिकांनी संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला चढविला. पन्नास खोके एकदम ओके अशा घाेषणा देखील देण्यात आल्या होत्या. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला हाेता.
या प्रकरणी अंजनगाव पोलिसांनी पंधरा ते वीस शिवसैनिकांवर कलम 353 सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्यस्थितीत हल्लेतील शिवसैनिक अभिजीत अकोटकर ,महेंद्र डीपटे यांच्या सह अकरा शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे अशी माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली आहे.
ठाणेदार दीपक वानखडे म्हणाले आमदार संताेष बांगर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आम्ही ताब्यात घेतलेल्यांची चाैकशी करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करीत आहाेत. दुपारनंतर संबंधितांना न्यायालयात पाठविले जाईल असेही वानखेडेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.