Navratri: मुख्यमंत्री शिंदेंची माेठी घाेषणा; नवरात्रोत्सवात महिलांसाठी विशेष अभियान

नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांची महिलांसाठी विशेष घाेषणा
Eknath Shinde news
Eknath Shinde news SaamTV
Published On

मुंबई - आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाकडून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास, समृद्धीकरिता व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊया अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनामुळं (Corona) गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival) निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे.

Eknath Shinde news
Sukesh Chandrashekhar Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे "माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे विशेष अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शारदीय नवरात्रोत्सव आपल्या मातृभक्त संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मातृशक्ती आणि स्त्री शक्तीचा जागर करण्याचा, तिच्या समोर नतमस्तक होण्याचा उत्सव आहे. (Mata Surakshit Tar Ghar Surakshit Abhiyan)

या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आजपासून आपण "माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे विशेष अभियान राबविणार आहोत. ५ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी रहावी,जागरूक रहावी व समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी अशी विनंती. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 2 या वेळेत 18 वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे. आजारी महिलांना उपचार आणि आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच सर्व माता भगिनींनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com