Money Laundering Case
Money Laundering CaseSaam Tv

Sukesh Chandrashekhar Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे.
Published on

Money Laundering Case: 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्रीला पटियाला हाऊस कोर्टातून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जॅकलीनविरुद्ध आरोपपत्र सादर केल्यानंतर तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. (Jacqueline Fernandez Bail)

Money Laundering Case
Shardiya Navratri 2022 : नवरात्रीच्या काळात उपवास करताय ? 'या' फळांचे सेवन करा, राहाल दिवसभर ऊर्जात्मक

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव 200 कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आलं होतं. ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी तिचे नाव जोडलं गेले होते.चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला भेटवस्तू देखील दिल्या होत्या’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. त्यानंतर पटियाला कोर्टालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आणि जॅकलिनला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यानंतर आज जॅकलिन कोर्टात हजर झाली.

17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते, या आरोपपत्रात सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलिनला यापूर्वीच होती, असा दावा ईडीने केला आहे. जॅकलीनला 200 कोटींच्या वसुली प्रकरणातही आरोपी आढळली होती. त्यानंतर जॅकलिनच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, आता जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे . पटियाला हाऊस कोर्टातून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जॅकलिनच्या स्टायलिस्टची चौकशी करण्यात आली

जॅकलिन फर्नांडिसची ड्रेस डिझायनर लिपाक्षीची 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने सात तास चौकशी केली. ज्यामध्ये लिपाक्षीने सुकेश आणि जॅकलिनबद्दल अनेक खुलासे केले होते. सुकेशने जॅकलिनला कपडे आणि भेटवस्तू देण्यासाठी तिला तीन कोटी रुपये दिल्याची कबुली दिली आहे. चंद्रशेखरच्या अटकेच्या वृत्तानंतर जॅकलीन फर्नांडिसने त्याच्याशी संबंध तोडले, असेही लिपक्षी इलावाडीने सांगितले.

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. काही काळापूर्वी जॅकलिनशिवाय नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात जॅकलिन आणि नोराशिवाय अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि पिंकी इराणी यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com