Rupali Thombare Patil NCP Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: 'मनसेनं 2019ला तिकीट कापलं होतं, आता पक्षाने आदेश दिला तर...' कसबा पोटनिवडणुकीसाठी रुपाली पाटील सज्ज

'राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Rupali Thombare Patil News : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं कर्करोगाने निधन झाल्यानंतर कसबा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणुकीत लढण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. रुपाली पाटील म्हणाल्या, ' मुक्ता टिळक यांचं आजारांनं निधन झालं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कसबा पोटनिवडणुक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार आहे. मुक्ताताई 2019 विधानसभा निवडणुकीत आमदार झाल्यापासून आजारी होत्या. मुक्ता टिळक या आजारी असताना त्यांनी शक्य तेवढं काम केलं'.

'अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत. कोणाचं दुःखद निधन झाल्यानंतर भावनिक म्हणून विचार होऊ शकतो. भाजपने अनेक ठिकाणी निवडणूक लावल्या आहेत,पंढरपूर,मुंबईमध्ये पोटनिवडणुक झाल्या, असे त्या पुढे म्हणाल्या.

'कसबा मतदारसंघात असंही काम झाली नाहीत. खासदारही आजारी आहेत. मुक्ताताई यांच्या घरात तसेही कोणी निवडणूक लढवणार नाही. त्यात मुळात २०१९ साली मनसेने माझं तिकीट मुक्ता टिळक यांच्यासाठीच कापल होतं', असा खुलासा रुपाली पाटील यांनी केला. रुपाली पाटील यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर कसबा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार, पोटनिवडणुकीत उमेदवार देणार का, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की; घरी तयार करा हा हेल्दी हेअर मास्क

Hair Care : रात्री केस बांधून झोपताय? 'या' महत्त्वाच्या ६ गोष्टी जाणून घ्या नाहीतर पडेल टक्कल

Fact Check: अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किमी आत घुसले चिनी सैन्य, काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य?

रात्री बेडरूमचा दरवाजा बंद करावा की उघडा ठेवावा?

Maharashtra News Live Update : ताडोबाच्या जंगलात वाघ दिसताच पर्यटकांची हुल्लडबाजी

SCROLL FOR NEXT