sunetra pawar ncp  Saam tv
मुंबई/पुणे

राष्ट्रवादीचा काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार ठरला; पक्षाच्या बैठकीतून नावाची अधिकृत घोषणा

ncp latest marathi : राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेच्या उमेदवाराचं नाव अंतिम झालं आहे. पक्षाच्या कार्यकारणीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर

पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली

पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अधिकृत घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाची राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार ठरला आहे. पक्षाच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त झाल्या आहेत. या ७ जागांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीने ६ जागांसाठी दंड थोपटले आहेत. या निवडणुकीत भाजप ४ जागांवर उमेदवार रिंगणात उभे करतील. भाजपने ४ पैकी एक जागा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवलेंना देण्याचं निश्चित केलं आहे. तर तीन जागा स्वत: भाजप लढणार आहे. तर प्रत्येकी १-१ जागा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.

भाजप आणि शिंदे गटाने अद्याप राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. भाजप आणि शिंदे गटाआधी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीने पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पार्थ पवार यांची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या संख्याबळावर पार्थ पवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. एकीकडे दोन्ही गटाचे विलीनकरणाचे दरवाजे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यसभेनंतर पक्षातही पार्थ पवार यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

महाराष्ट्रातून कोणते राज्यसभा सदस्य निवृत्त होणार?

शरद पवार

रामदास आठवले

फौजिया खान

प्रियांका चतुर्वेदी

धैर्यशील पाटील

रजनी पाटील

भागवत कराड

राज्यसभा निवडणुकीचं वेळापत्रक

5 मार्च रोजी राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. या अर्जाची छाननी ६ मार्च रोजी होणार आहे.तर 9 मार्च उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 16 मार्च रोजी सकाळी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. पुढे सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane rain : ठाण्यात पावसाचा पहिला बळी! १७ वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात मुसळधार पावसाचा फटका!

Fact Check: 10वी, 12 वी पासवाल्यांसाठी सरकारी नोकरी? केंद्र सरकारने काढली बंपर भरती?

खासदार अमोल कोल्हेंना कुणाची ऑफर? ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार?

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

SCROLL FOR NEXT