भिगवणमधील तरुणी आईकडे परतणार? कोर्टात जबाब बदलला, अचानक नेमकं काय घडलं?

pune bhigwan case : भिगवणमधील तरुणीने कोर्टात जबाब बदलला आहे. तिने आईकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
pune bhigwan
pune bhigwan case Saam tv
Published On
Summary

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट

भिगवणमधील तरुणीने जबाब बदलला

अतिरिक्त सत्र न्यायालयात केली आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त

पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भिगवण प्रकरणातील तरुणीने कोर्टात तिचा जबाब बदलला आहे. बारामती पोलीस ठाणे आणि कोर्टात मुलासोबत राहायचं असल्याचे राहायचे असल्याचे म्हणालेल्या तरुणाने आता जबाब बदलला आहे. या तरुणीने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भिगवण प्रकरणात नवनवीन अपडेट हाती येत आहेत. भिगवन अपहरण प्रकरणातील तरुणी इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात पोहोचली. त्यावेळी तिने आई आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली आहे.

तरुणीने बारामती सत्र न्यायालयासमोर आईसोबत जाणार नसल्याचे म्हटली होती. तरुणीने जहीर शेखसोबत जाणार असल्याचे सांगितलं होते. या प्रकरणात आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला व्हिडिओ कॉन्फेरन्सिंगद्वारे तरुणीला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तरुणीने आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

pune bhigwan
बजेटआधीच तिजोरीत खडखडाट; फुकट्या योजनांमुळे राज्य अडचणीत, VIDEO

भिगवण प्रकरणातील तरुणी आधी तरुणासोबत राहण्यावर ठाम होती. तिने बारामतीमधील पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी तिने जहीर शेखसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तरुणीला सुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या तरुणीने आज कोर्टात आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, तरुणी आईकडे कधी जाणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरुणीने जबाब बदलल्याने भिगवण प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

Q

भिगवण प्रकरणात आता काय घडलं?

A

तरुणीने कोर्टात आधीचा जबाब बदलला आहे. तिने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.

Q

तरुणीने काय म्हटलं होतं?

A

बारामती न्यायालयात जहीर शेखसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com