Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News: शिंदे-फडणवीस सरकारची घटस्फोटाकडे वाटचाल; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मोठी भविष्यवाणी

Maharashtra Political News: राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या वाटचाल घटस्फोटाकडे सुरू आहे, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे.

Rashmi Puranik

Mumbai News: शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिंदे गट-भाजपच्या नेत्यांमध्ये बिनसल्याही चर्चा आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या वाटचाल घटस्फोटाकडे सुरू आहे, अशी भविष्यवाणी केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीवर आव्हाड म्हणाले, 'सरकरला वर्ष झाल्याचा दिवस बायको माहेरी साजरी करत आहे. तर नवरा दुसरीकडे साजरा करत आहे. एक वर्ष झाले, प्रेम काही जमले नाही. सगळं काही आलबेल आहे, असं दिसत नाही. त्यांची घटस्फोटाकडे वाटचाल सुरू आहे, असे दिसते. आज पण दोन जाहिराती दिसल्या आहेत'.

ठाण्यात काही ठिकाणी पाणी तुंबले आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडलं. 'ठाण्यात इतके पाणी तुंबले होते की, ठाण्याच्या इतिहासात इतके पाणी तुंबले नव्हते. मी दहा वेळा ट्विट केले, पण नालेसफाई झाली नाही. पाणी तुंबणार होते, तरी कोणी लक्ष दिले नाही, अशी टीका आव्हाड यांनी टीका केली.

'तुम्ही त्यांना पेंग्विन म्हणा किंवा डुक्कर म्हणा, काय होत आहे हे जनतेला कळते. सायनमध्ये पाणी तुंबत असेल तर तुम्ही तेव्हा आधी बातमी दाखवायचे. आज मुंबई आणि ठाण्यात पाणी तुंबले तर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, कशाला टीका करतात, पाऊस आला स्वागत करा, असे आव्हाड म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या विस्ताराच्या चर्चावर आव्हाड म्हणाले, 'लवकरात लवकर विस्तार होऊ दे. अनेक जण कपडे शिवून बसले आहेत. त्याचे पैसे दिले आहेत. शिरसाट, गोगावले, बांगर हे माझे मित्र आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लवकर केलं तर बरे होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

Marathi School : आपुल्या घरात हाल सोसते...! मुंबईतील आणखी एक मराठी शाळा बंद होणार

SCROLL FOR NEXT