jayant patil  saam tv
मुंबई/पुणे

गुलाबराव पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर जयंत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले,'भाजपबरोबर...'

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Jayant Patil News : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार फुटणार असा दावा केला आहे. शहाजी बापू पाटील यांच्या दाव्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठं भाष्य केलं आहे. 'शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती, असा गौफ्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

गुलाबराव पाटील (GulbaRao Patil) यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांचा दावा खाडून काढला. जयंत पाटील म्हणाले, 'भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जाण्याची शक्यता नाही. आता ही वक्तव्य केली जात आहेत. उलट उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली'.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली. या भेटीवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, 'दोघांचे वैयक्तिक संबंध होते. यात राजकारण आणण्याची गरज नाही'. तर साखर निर्यात बंदीवरून जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. 'केंद्र सरकारने निर्यात बंदी करणे, त्यात कोटा देणे. त्यात युपी कारखान्यांना सवलती देणे, विशेष सुविधा देणे आणि महाराष्ट्रात कारखान्यांना साखर निर्यातीवर मर्यादा घालणे अन्यायकार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT