Mumbai News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोणत्या मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली माहिती नाही. मात्र ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सारखं काहीतरी अघटित घडत आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरात ते बोलते होते. (Political News)
जयंत पाटलांनी खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेवरूनही सरकारला टोला लगावला. खारघरमध्ये जे घडलं तसा त्रास आमच्या कार्यकर्त्यांना होऊ नये यासाठी खास मंडप टाकून हे शिबीर आयोजित केले आहे.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात जे काही घडलं सरकारने आयोजित केला होता. श्री सदस्यांना मृत्यू उष्माघाताने झाला का? कार्यक्रम झाल्यानंतर मृत्यू झाला का? मृत्यू उष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने झाले? वेळ कुणी ठरवली ? 2 ते 3 न्यायाधीशांची समिती नेमून याची चौकशी झालाी पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे, अशी मागणीही जयंत पाटलांनी केली. (Latest News Update)
मुंबई महानगरपालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहे. यावर देखील जयंत पाटलांना भाष्य केलं आहे. याआधी महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करत होतो. मात्र महाविकास आघाडी याठिकाणी झाली तर आपण चांगली संख्या वाढवू शकतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडीची शिंदे-फडणवीस सरकारला भीती आहे. म्हणून सरकार निवडणूक जाहीर करत नाही. जेव्हा सरकारला आत्मविश्वास येईल तेव्हा ते निवडणुका लावतील, असा दावाही जयंत पाटील यांनी यावेळी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.