Jayant Patil on Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar Retirement: साहेब, तुम्हाला परस्पर निर्णय घ्यायचा अधिकार नाही; जयंत पाटलांना रडताना पाहून शरद पवारांच्याही डोळ्यांत पाणी

राष्ट्रवादीचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घेण्याची विनंती केली.

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात भाषण करताना शरद पवार  यांनी ही घोषणा केली आहे. यानंतर अख्ख सभागृह स्तब्ध झालं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घेण्याची विनंती केली. जयंत पाटलांना यावेळी बोलताना अश्रू अनावर झाले. तुमचा राजीनामा आम्हालाच नाही तर देशातील कुणालाही मान्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. यावेळी जयंत पाटील आणि शरद पवार भावनिक झालेले दिसले.

लोकांसमोर कुणाच्या नावाने जायचे

जयंत पाटील हे बोलण्यासाठी उठले. मात्र भावनिक झालेल्या जयंत पाटलांच्या शब्द बाहेर पडले नाहीत. त्यानंतर जयंत पाटील पुन्हा खाली बसले. यावेळी जयंत पाटलांना आधार देताना इतर नेते दिसले. आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही पवार साहेबांच्या नावाने मते मागितली. पवार साहेबच बाजूला गेले तर आम्ही लोकांसमोर कुणाच्या नावाने जायचे, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.  (Letest Marathi News)

परस्पर निर्णय घेण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही

राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांच्या नावानेच ओळखला जातो. साहेब परस्पर निर्णय घेण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तुमचा हा निर्णय आम्हालाच नाही तर देशातल्या कुठल्याही व्यक्तीला मान्य होणारा नाही. तुम्ही निर्णय मागे घ्यावा, तुमच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजूनही हवा आहे, असं आवाहन जयंत पाटलांनी केलं.

तुम्ही थांबणार असाल तर आम्हीही थांबतो

काही दिवसांपूर्वी तुम्ही भाकरी फिरवण्याची भाषा केली. देशाच्या सर्वोच्च ठिकाणी तुमची प्रतीमा आहे. आमचे सर्वांचे राजीनामे घ्या, तुम्हाला नव्या लोकांच्या हाती पक्ष द्यायचा असेल तर द्या. पण पक्षप्रमुखपदावरून बाजूला जाणे हे कुणाच्याच हिताचेच नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्हीही थांबतो, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाऊबिजेसाठी मेहंदी काढताय? 'या' झटपट काढणाऱ्या डिझाईन्स पाहाच

Maharashtra Live News Update : पुण्यातील कोथरूड सुरोत्सव मध्ये "द फोक आख्यान" ची धूम

Diwali Meditation: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिवाळीतल्या दिव्यांचा करा वापर, वाचा तज्ज्ञ काय म्हणाले

Pimpari Crime News : पिंपरी पोलिसांचा गुन्हेगारांना दणका! अल्पवयीन मुलांकडून बंदूक आणि काडतुसे केली जप्त, नेमकं काय घडलं?

IND vs AUS: रविवार असूनही सकाळी लवकर उठलो, पण...; ८ आणि ० वर बाद होणाऱ्या रोहित-विराटचे मीम्स व्हायरल

SCROLL FOR NEXT